महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूरातील भरत आछडावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- महिलेला लग्नाचे आमिष दाखवून व तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूरातील भरत आछडा याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करू नये म्हणून आछडा याने संबधीत महिलेवर दबाव आणला होता.

याबाबत ४५ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली. त्यानुसार बंटी आछडा  (वय ३३, रा. वार्ड क्रमांक ७ श्रीरामपूर) याच्याविरोधात भादवि कलम ३७६ व ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास  उपविभागीय पोलिस अधिकारी  राहुल मदने हे करीत आहेत १६ वर्षापासून तो पिडीत महिलेचा लैगिक छळ करत होता.

आछडा याने पिडीत महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेवुन लग्न करण्याचे खोटे नाटक करुन वेळोवेळी त्यांच्या घरी,तसेच मित्राच्या अशोकनगर येथील घरामध्ये व इतर ठिकाणी घेवुन जावुन बळजबरीने बलात्कार केलेला आहे व पिडीतेस फ्लॅट घेवुन देतो असे सांगुन फ्लॅट खरेदी करुन दिले नाही व विश्वासघात करुन फसवणुक केलेली आहे. आछडा यांनी यापूर्वीही एका पोलीस कर्मचाऱ्याला ऑन ड्युटी असताना दम दिला होता परंतु मोठी सेटलमेंट झाल्यामुळे त्यावेळी ३५३ गुन्हा दाखल झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here