एकाच ठिकाणी दीर्घ कालावधीपासून कार्यरत असलेल्या दत्तनगर ग्रामपंचायतील ग्रामसेवकांची बदली करावीत, असे पत्र भाजपा अनुसूचित आघाडी चे जिल्हाध्यक्ष अशोक लोंढे हे जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायत मधील  ग्रामसेवक एकाच ठिकाणी बऱ्याच कालावधीपासून कार्यरत आहेत त्यांची बदली होणे आवश्यक आहे.   तत्कालीन राज्य सरकारने ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या करू नयेत, असा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी अनेक ग्रामसेवक कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत.

श्रीरामपुर तालुक्यातील दत्तनगर भागातील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक कोणत्याही योजनांची माहिती देत नाही त्यातल्या त्यात त्याचा कार्यकाल पूर्ण झाला असून नविन ग्रामसेवक नियुक्त करावा या मागणीसाठी भाजपा अनुसूचित आघाडी चे जिल्हाध्यक्ष अशोक लोंढे हे लवकरच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे. व जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागात वर्षानुवर्षे अनेक अधिकारी एकाच ठिकाणी खुर्चीला चिटकुन आहेत अनेकदा त्यांच्या विषयी सामन्य नागरीकांना उर्मट वागणुक देतांना दिसतात अनेक तक्रारी करून ही त्यांच्या बदल्या होत नाही नेमकं कोणाचे हात यांच्या डोक्यावर असतात की मेहरबानी ऐवढा मुजोर पणा कोणाच्या जीवावर चालतो तेच समजायला तयार नाही आता तरी प्रशासनाणे याची दखल घ्यावी असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here