शैक्षणिक शुल्क संपूर्ण भरण्याची सक्ती करणाऱ्यांच्या विरुद्ध ‘आप’ आंदोलन करणार- आप’चे डुंगरवाल

श्रीरामपूर – गेल्या दोन वर्षांपासून कोरोना  काळामध्ये सर्व शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत यामध्ये शिक्षक ऑनलाइन पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य करत आहेत.विद्यार्थी स्वखर्चाने मोबाईलचा रिचार्ज करून तासाला उपस्थिती लावतात,बऱ्याच ठिकाणी काही विद्यार्थ्यांना या ऑनलाइन तासांना बसता येत नाही शाळा विद्यार्थ्यांना शालेय फी मध्ये सक्ती करताना दिसतात तसेच  इतर फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करत आहेत.असे अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे. या पुढील काळात कोरोना काळातील शाळा व संस्थांनी विद्यार्थ्यांना पूर्ण फी भरण्याची सक्ती करतील अशा शाळांचे विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे यांनी दिलाय,

नुकतीच चालू  शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने तास घेतले जात आहेत. परंतु मागील वर्षाची फी भरली नसल्याने ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना लिंक न पाठवून त्यांना वर्गात बसू न देण्याची प्रकरणे समोर आली आहेत. शालेय फी चा तगादा लावून पालकांना वेठीस धरले जात आहे. वीजबिल, देखभाल यासारखे शाळेचे इतर खर्च कमी झाले असून देखील फी कमी केली जात नसल्याचे समोर आले आहे. शाळेच्या फी मध्ये 50% सवलत द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांना देण्यात आले.

सर्व शाळांनी आपल्या मागील वर्षीच्या खर्चाचे ऑडिट करून अतिरिक्त जमा रकमेचा परतावा पालकांना करावा असे आदेश शिक्षण विभागाने द्यावेत, शालेय वर्षाचा कार्यकाळ व अभ्यासक्रम ठरल्यानंतरच पालक शिक्षक कार्यकारी समिती तयार करून त्यांची मान्यता घेतल्यावरच नवीन शालेय वर्षाची फी आकारावी  अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढणे, पालकांना फी भरण्यास मुदतवाढ न देता मानसिक त्रास देणे असे प्रकार शाळांनी करू नयेत यासाठी शिक्षणाधिकार्यांनी सक्त सूचना द्याव्यात अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा सचिव राहुल रणपिसे, आपचे प्रवक्ते प्रवीण जमधडे, अध्यक्ष किशोर वाडीले, युवा अध्यक्ष अक्षय कुमावत, यशवंत जेठे, राज मोहम्मद शेख, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here