श्रीरामपूर/प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडी दत्तनगर शाखेच्या वतीने दत्तनगर ते टिळकनगर रस्त्याच्या कडेला जॉगिंग ट्रॅक तयार करा या मागणीचे निवेदन दत्तनगर ग्रामपंचायतला देण्यात आले, दत्तनगर टिळकनगर  आंबेडकर वसाहत या परिसराच्या लगत इंडस्ट्रीज एरिया असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते या परिसरातील वयोवृद्ध व लहान मुलं  तरुण-तरुणी यांना नैसर्गिक शुद्ध हवा मिळणे कठीण झाले आहे म्हणून दत्तानगर टिळकनगर आंबेडकर वसाहत या ग्रामपंचायत हद्दीतील राहात असलेल्या लोकांना सकाळी व सायंकाळी शुद्ध हवा मिळावी म्हणून व परिसरातील लोकांची ऑक्सिजन लेवल टिकून राहावी म्हणून वंचित बहुजन आघाडी  दत्तनगर  शाखेच्या वतीने सरपंच सुनीलभाऊ  शिरसाठ व ग्रामसेवक धकतोंडे यांना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन दत्तनगर परिसरातील प्रसिद्ध उद्योजक नागेशअण्णा क्षिरसागर तालुका संपर्क प्रमुख किशोर भाऊ ठोकळ शाखाध्यक्ष नयनजी क्षिरसागर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले,यावेळेस वंचित बहुजन आघाडी चे मिलिंद जगताप आनंद पठारे रामदास रेने भास्कर माघाडे सोनू डोळसे प्रकाश हूसळे सुनील जाधव राजू जावळे अनिल उंबर्डे सलीम भाई खान कंदर पटेल सचिन बाबा पगारे राठोड तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड सुरेश जगताप हिरामण जाधव अशोकराव लोंढे राहुल अल्हाट प्रवीण माघाडे संदीप त्रिभुवन सागर त्रिभुवन सिद्धार्थ त्रिभुवन अशोक शिंदे अनिल पठारे बापू सणाचे आधी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनाचे वाचन बाबा पगारे  व सोनू डोळस यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here