श्रीरामपुर/प्रतिनिधी :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतुन 21 जुन जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून श्रीरामपूर भा ज पा च्या वतीने भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ गोंदकर तसेच जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेठ राठी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संत गाडगे बाबा उदयान वाॅ.1 श्रीरामपूर या ठिकाणी योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या योग शिबीरामधे 40 महिला व 20 पुरूषांनी आपला सहभाग नोंदवला या शिबिरासाठी प्रसिद्ध योग प्रशिक्षक अनिल कुलकर्णी सर, उदयजी वाणी व महिला प्रशिक्षक सौ कुलकर्णी मॅडम व सौ सरोदे मॅडम यांनी सहभागी झालेल्यांना योगाचे धडे दिले व योगाचे महत्व पटवून सांगितले. योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झाले आहे असे अनिल कुलकर्णी सरांनी सांगितले भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास 200 देशांनी स्विकारली आहे उदयजी वाणी सरांनी सूर्यनमस्कार व वेगवेगळ्या योगाचे महत्व पटवून सांगितले रोगप्रतीकार शक्ती वाढवणे व मनाचे सामर्थ वाढवणे यासाठी योगसाधना उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे निमित्ताने कोरोना काळामधे अधिकाधिक लोकांनी योग साधना करणे आवश्यक आहे असे आवाहन भा ज पा मा शहर अध्यक्ष मारूतीभाऊ बिंगले यांनी केले. योग वाद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवावे अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली. डिसेंबर 2014 ला 159 देशाचे समर्थन मिळवून 21 जुन हा जागतिक योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला आजच्या दिवशी भारतातील 40 हजार योग शिक्षक हे वेगवेगळ्या देशांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी गेले आहेत योग दिवस अलिकडच्या काळातील वैश्विक सहमतीचे प्रतिक ठरला असल्याने हा भारतीय संस्कृतीस मिळालेला मानाचा तुरा आहे.

यावेळी अनिल कुलकर्णी सर, उदयजी वाणी सर,सौ कुलकर्णी मॅडम, सौ, सरोदे मॅडम यांचा योग दिवसाचे औचित्य साधून ट्राॅफी आणि फुलांचा गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला प्रशिक्षणास आलेल्या प्रत्येक शिबीरार्थीचा गुलाबपुष्प देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पोपहाराचे आयोजन देखील करण्यात आले होते. या शिबिरास शहर अध्यक्ष श्रीरामपूर मारूती भाऊ बिंगले जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेठ राठी. औ. आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनील चंदन. युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव. सांस्कृतिक सेल भाजपा जिल्हा अध्यक्ष बंडुकूमार शिंदे.उपाध्यक्ष विनोद वाघमारे सर. उद्धव गिरमे.अनिल ओबेरॉय. रवि पंडित. सलीम जहागीरदार. दिपक जाधव. अभिजीत कांबळे. शुभम बिंगले. यशराज शिंदे. अमोल जावरे .सचिन मरसाळे. कृष्णा आढागळे. राज गायकवाड. पटेल सर .आकाश बिंगले. रेखा निर्मळ मॅडम. गायकवाड मॅडम. पटेल मॅडम. ओबेरॉय मॅडम. शिंदे मॅडम. नायर मॅडम. देशपांडे मॅडम आदि उपस्थित होते.
सदर शिबिर पार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिन संयोजक बंडुकूमार शिंदे. सह संयोजक सुनील चंदन व विनोद वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले तर उपस्थितांचे शहर अध्यक्ष भा ज पा मारूती भाऊ बिंगले यांनी आभार मानले.