राहता (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील रांजणखोल येथे ३२ वर्षीय महिलेस शिवीगाळ करुन व लाथा बुक्यांनी व लाकङी सदृश्य वस्तूने मारहाण करण्यात आली महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरुन  ६ जणांविरुद्ध श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत महिलेचे पती यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, २० जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान आम्ही सर्वजण घरी असताना आमच्या शेजारी राहणारा आरोपी आबासाहेब ढोकचौळे याने दारु पिवुन येवुन काही एक कारण नसतांना माझी पत्नी व मला शिविगाळ केली त्यावेळी माझी पत्नी व मी त्यांना शिवीगाळ करु नका म्हणुन सांगीतले त्यानंतर वाद होवु नये म्हणुन मी गावात निघुन गेलो व त्यानंतर थोड्यावेळाने घरी भांङणे झाले असल्याचे फोनवरुन समजले व मी घरी आलो असता त्यावेळी आबासाहेब ढोकचौळे व गणेश ढोकचौळे म्हणाला की तुझ्या घरासमोरील  गटार नाली माझ्या हद्दीत आहे ती जागा तुम्ही वापरु नका तसे आम्ही खुप जणांना गावाच्या बाहेर काढले आहे तुम्हालाही काढु अशी धमकी दिली त्याने दिलेल्या धमकीमुळे आसपासचे लोक निघुन गेले  आमच्या घरातील माझी पत्नी,आई,वङिल, यांना शिवीगाळ केली शिविगाळ का करता असे विचारल्यावर माझी पत्नी व मला ६ जणांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली व हातातील लाकङी सदृश्य वस्तूने माझ्या पत्नीच्या पायावर व पोटात मारले  व माझ्या ८० वय असणा-या आजीस हात ऊगारुन शिविगाळ केली त्यात माझ्या वडिलांच्या ङोळयाखाली मार लागला आरोपी आबासाहेब लिंबाजी ढोकचौळे,गणेश आबासाहेब ढोकचौळे, महेश दत्तात्रय ढोकचौळे, रोहित दत्तात्रय ढोकचौळे, बाबासाहेब हरिचंद्र ढोकचौळे,लिला आबासाहेब ढोकचौळे सर्व रा.रांजणखोल  यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली  या फिर्यादिवरुन वरिल सर्व ६ आरोपिविरुद्ध श्रीरामपुर  पोलिसांनी भारतीय दंड सहिता १८६० प्रमाणे  कलम १४३,१४७,१४९,३२४, ३२३,५०४,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेङ काॅ.साईनाथ अशोक करत आहे

श्रीरामपुर पोलीसांची त्वरित कारवाई

दरम्यान सदर महिलेस व घरच्यांना झालेल्या मारहाणीचा प्रकार सी.सी.टि.व्हि मध्ये कैद झाला त्यामुळे सत्य परिस्थिती पोलीसांसमोर आली पोलिस निरीक्षक सानप यांच्या सुचनेनुसार श्रीरामपुर पोलीस ठाण्याचे पोलीस रघुविर कारखीले, श्री.राशिनकर, श्री.शेलार यांनी घटनास्थळी येवुन सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here