श्रीरामपुर (विशेष प्रतिनिधी )- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहीतीच्या अधारे छापा टाकून बनावट दारु बनविणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश केला असुन यात साडे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त खबर मिळाली की श्रीरामपुर येथील संजयनगर ईदगाह मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप संचालक अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे गणेश पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक एस बी शेंडे एस एम सराफ उपआधिक्षक अ विभाग ऐ बी बनकर निरीक्षक ब विभाग एस के कोल्हे निरीक्षक कोपरगाव बी बी हुलगे निरीक्षक श्रीरामपुर ऐ व्ही पाटील निरीक्षक पी व्ही अहीरराव एम डी कोडे व्ही एम बारवकर एम एस धोका एस बी भगत जगताप के यु छत्रे कुमारी घोडे नम्रता वाघ आदिंनी आपल्या सहकार्या समवेत ईदगाह मैदान संजयनगर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारु तयार केली जात असल्याचे आढळून आले या ठिकाणी बनावट दारु तयार करण्याकरीता लागणारे स्पिरीट २०० लिटर बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे ३०लिटर विदेशी मद्य १८०मिली क्षमतेच्या ४४० बनावट ब्रँण्डच्या बाटल्या बनावट देशी मद्याच्या १८०मिलीच्या ३८४बाटल्या तसेच देशी भिंगरी व संत्रा लेबलच्या बाटल्या बनावट देशी व विदेशी दारुची बुच नामांकिता कंपनी इम्पेरियल ब्लू व मेक्डाल न. १ विस्की राँयल स्टग कंपनीचे व भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्या कृत्रीम स्वाद पदार्थ इसेन्स व फ्लेवर बँरल ड्रम एम एच ०६ बी जी ०८५२ क्रमांकाची पिकअप वाहन असा सहा लाख एकुण पन्नास हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन मोहन यशवंत काळे रा दत्तनगर राकेशकुमार केवलप्रसाद दहीया उर्फ मुन्ना राहणार ईटामा कोठार तालुका अमरपाटण जिल्हा सतना मध्य प्रदेश ह मु संगमनेर चंद्रकांत शाम पवार यांचे विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पवार हा फरार झालेला आहे या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नागरीकांना अवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारे अवैध बनावट देशी विदेशी दारु निर्मीती खरेदी विक्री वहातुक करत असेल तर अशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी आपले नाव गुप्त ठेवले जाईल असे अवाहन करण्यात आले आहे