कोपरगाव/प्रतिनिधी :- शहरातील ओमनगरची पाईपलाईन ही सध्या ४ इंच आहे तशीच भागातील नळ कनेक्शन ही पाहिले ३० होती आता वाढली असून ३०० झाली आहे. ओमनगरची पाईपलाईन ही १९९८ साली  झाली असून आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे यांचा विचार करून नगरपालिकेने पाईपलाईन ८ इंच करावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष संदीप कपिले यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांना निवेदन देण्यात आले

याप्रसंगी राजेंद्र नानकर,दिगंबर राणे, उल्हास सोनवणे, सुरेश लाड, नवाजभाई कुरेशी, हर्षिकेश खैरनार ,सागर जाधव,उमेश महाजन, हिरामण महाजन, दत्तात्रय वाघ, संपत कापसे, कांतीलाल देवकर, संदीप कपिले, तसेच भागातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here