श्रीरामपूर : निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून सत्तेत आलेल्या तिघाडी सरकारला मात्र सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा जन आधार असलेल्या ओबीसी समाजाच्या आकसापोटी  सर्वोच्च न्यायालयात सरकारने व्यवस्थीत बाजू न मांडल्यामुळे हे राजकीय आरक्षण फेटाळले गेले. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने महाआघाडी सरकारविरोधात आज येथील शिवाजी चौकात घोषणाबाजी करीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

       सकाळी ११ वाजता मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते येथील शिवाजी चौकात जमा झाले. शहराध्यक्ष मारूती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, उत्तर नगर सरचिटणीस सुनील वाणी,  आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी केली. सरकारला ओबीसी समाजाचे काही घेणे देणे नाही. केवळ भाजपाचा जनाधार असल्याच्या आकसापोटी सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही. आणि केवळ त्यांच्या नाकर्तेपणामुळेच हे राजकीय आरक्षण फेटाळण्यात आले. भाजपा ओबीसी वर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात समाजाच्या मागे खंबीरपणे उभे असून अन्यायाविरोधात संघर्ष करीत उभे राहील. ओबीसीचे रजकीय आरक्षण पुर्नस्थपित होत नाही. तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही.  असा इशारा यावेळी देण्यात आला.

       यावेळी सुनिल मुथ्था, मारूती बिंगले, बबन मुठे, गणेश राठीसतिश सौदागर, प्रफुल्ल डावरे, शरद बेळे आदींची भाषणे झाली.

आंदोलनास उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष सतिश सौदागर, राम तरस, ज्येष्ठ नेते सुनील मुथ्था, उत्तर नगर जिल्हा सचिव अनिल भनगडे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, दत्तात्रय देवकाते, श्रेयस झिरंगे, सुरेश बडजाते,  प्रफुल्ल डावरे, पुरूषोत्तम भराटे, माजी सरपंच भरत साळुंखे, बापू वडितके, अजित बाबेल, राजेंद्र कांबळे, मच्छिंद्र हिंगमिरे, ओबीसी शहराध्यक्ष प्रवीण बोराडे, चंद्रकांत परदेशी, मिलींद साळवे, अरूण धर्माधिकारी, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक विठ्ठल राऊत, सांस्कृतिक आघाडीचे बंडुकुमार शिंदे, औद्योगिक आघाडीचे जिल्हा संयोजक सुनील चंदन, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रूपेश हारकल, राहूल आठवल, दिपक मिसाळ, विजय आखाडे, विशाल अंभोरे, गणेश बिंगले, रवी पंडीत, साजिद शेख, दिनेश मांडगे, सुरजित भटियाणी, गणेश अभंग, अमोल अंबिलवादे, किरण जगताप, अभिजीत लोंढे, किरण रोकडे, ललित गाडेकर, महाराष्ट्र विश्वकर्मा कारागीर युनियन जिल्हाध्यक्ष मनोज जाधव, शहराध्यक्ष निलेश सोनवणे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे, जिल्हा सचिव राजेश सुर्यवंशी, राजेश सुर्यवंशी, निलेश जाधव, जालिंदर रोडे, आबा देवकर, हंसराज बतरा, जसपाल सिंग साहणी् तालुका युवा मोर्चाचे दत्ता जाधव, यागेश राऊत, वैभव ढवळे, रूद्रप्रताप कुलकर्णी, विठ्ठल शुक्ला, आण्णा भालेराव , रवी कनगरे , गणेश घोडके , विशाल गायधने , अक्षय कावरे , हर्षल थापा , आदेश मोरे , विजय पालवे , सुरेश भालेराव ,  अनिल शेजुळ , आंनद पवार , राजु जाधव , विक्की जाधव , लहू खंडागळे , राजु धामोने , मुन्नाभाई शेख , अक्षय काळे , विकास  गायकवाड, दिनेश दळवी , राजु सौदागर , भरत गांगुर्डे , कुणाल धामोने , सागर सौदागर , आकाश हिवाळे , विशाल साबळे , अमोल मावस आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनानंतर तहसीलदार प्रशांत पाटील व पोलिस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here