श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातील दत्तनगर या भागातील 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तीचे लवकरात लवकर लसीकरण करा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा भीमशक्ती व दत्तनगर परिवर्तन आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी श्रीरामपुर येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे

यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर गाव खैरी निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असून या गावाची लोकसंख्या 20 हजारांच्या आसपास आहे या गावामध्ये मागच्या महिन्यात 44 ते 70 वयोगटातील दीडशे डोस देण्यात आले होते त्यानंतर या गावाकडे परत आरोग्य विभागाचे लोक बघायला कोणी तयार नाही आसपासच्या गावांमध्ये लसीकरण पूर्णावत झाले आहे मग दत्तनगर गावावर हा अन्याय का या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग असून त्यांना नेहमी कामानिमित्त बाहेर जावे लागते त्यांचा प्रपंच हा त्यांच्यावर अवलंबून आहे त्यामुळे त्यांना लसीकरण करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तरूण वर्ग लसीकरण ची वाट पाहत आहे त्यामुळे लवकरात लवकर दत्तनगर गावात 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण करण्यात यावी अन्यथा परिवर्तन आघाडीच्यावतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन द्यान्यात आले

यावेळी सुनील संसारे सचिन खांडरे अनिल कटारनवरे भारत लोखंडे अरूण खडिझोड अनिल उंबरडे सचिन राठोड प्रमोद भालेराव सह भिमशक्ती चे पदाधिकारी  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here