श्रीरामपुर/प्रतिनिधी :- समाजवादी पार्टीचा राज्यात मोठा विस्तार व्हावा या उद्देशाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु असिम आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पक्षाची मोठी घोडदौड चालू असून या निमित्ताने नुकतेच श्रीरामपूर येथे समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता सम्मेलन तथा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले

या संमेलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव अकीलभाई शेख, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रऊफभाई शेख, महारष्ट्र प्रदेश सचिव अय्यूबखान, औरंगाबाद महानगर अध्यक्ष फैसल खान, महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव गुड्ड काकर, सिद्दीक खान औरंगाबाद सचिव,अमीर पठाण, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

या कार्यक्रमात समाजवादी पार्टीच्या श्रीरामपुर शहर कार्यकरणी पदाधिकाऱ्यांना पदाची जबाबदारी सोपविण्यात आली, यामध्ये श्रीरामपूर शहरउपाध्यक्षपदी जावेद पठाण, कार्याध्यक्षपदी इरफान पठाण, शहर सचिवपदी अब्दुल सैय्यद, शहर संघटकपदी मतीन शेख, शहर सहसंघटकपदी परवेज शेख,श्रीरामपुर शहर युवक अध्यक्षपदी इमरान शेख, श्रीरामपुर सोशल मीडिया अध्यक्षपदी जकरिया सैय्यद, आदींची निवड करण्यात आली, या कार्यक्रमात समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, शहराध्यक्ष समीर शेख, आसिफ तांबोळी,शानवाज़ शाह, अरबाज़ कुरैशी, रवि बोरसे, अमन इनामदार,फैजान सैय्यद, जब्बारभाई शेख,तौफीक शेख, अमन शेख,दीपक पवार, दानिश शेख,मोसीन शेख, हारूण पठाण, सोनु विछुड़कर,मोसीन हाजी शेख,संतोष त्रिभूवन, वसीम पठाण,अनवर तांबोळी,एजाज़ शाह, इमरान पिंजारी,परवेज बागवान,तबरेज शेख,जाकीर शेख,सोहेल बागवान,शहबाज समंदर,राजू अंसारी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरासोबतच ग्रामीण भागातही प्रत्येक गांवात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे आहे,करीता सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची आवड असलेल्या मान्यवरांनी संपर्क साधावा असे आवाहनही जोएफ जमादार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here