श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातील दत्तनगर भागात दत्तनगर ग्रामपंचात व ग्रामस्थ यांच्या सौजन्याने स्व . संजय ऊर्फ काकासाहेब शिंदे यांचे स्मरणार्थ दत्तनगर मोफत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते त्यांचे उद्घाटन तहसीलदार प्रशांत पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कोविड केयर सेंटरमधील पदाधिकारी यांनी दानशुरणा मदतीसाठी आव्हान केले होते त्यांच्या आव्हानाला दाद देत अनेक दानशुरनी मदत केली परंतु यांचा कोणकोणत्या कामासाठी उपयोग करण्यात आला त्याची माहिती मिळावी या मागणीसाठी भिमशक्ती चे जिल्हाध्यक्ष तथा दत्तनगर परिवर्तन आघाडी चे अध्यक्ष संदीप मगर यांनी तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांतधिकारी अनिल पवार यांना निवेदना मार्फत मागणी केली आहे

यापुढे मगर म्हणाले की दत्तनगर ग्रामपंचात व ग्रामस्थ यांच्या सौजन्याने स्व . संजय ऊर्फ काकासाहेब शिंदे यांचे स्मरणार्थ दत्तनगर मोफत कोविड केअर सेंटर हे बरेच दिवस झाले तात्पुरता स्वरूपात बंद करण्यात आले आहे या कोविड सेंटरला अनेक लोकांनी येथे असणाऱ्या रुग्ण लवकर बरा होवा या उद्देशाने अनेक दानशूर लोकांनी आर्थिक मदत केली होती या सेंटरसाठी पुष्कळ निधी गोळा करण्यात आला असून रुग्ण नसल्याने सदर कोविड सेंटर ४ जून रोजी तात्पुरता स्वरूपात बंद करण्यात आले आहे आम्ही अनेक वेळा ग्रामपंचायत अंतर्गत कोविड केयर सेंटर मधील पदाधिकारी यांना हिशोबाची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करण्यात येत आहे या सेंटरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे यांची चोकशी होऊन गैरव्यवहार बाहेर काढावा व भागातील नागरिकांना खरी माहिती मिळावी ही माहिती न मिळाल्यास भिमशक्ती संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्यात येईल. अशी माहिती भिमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी निवेदना मार्फत मांडली आहे

यावेळी भिमशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड सुनील संसारे नितीन वाघमारे दिलीप वाघमारे भारतभाऊ लोखंडे सचिन खांडरे प्रमोद भालेराव बाबा बनसोडे सोमनाथ पटाईत अंबादास निकाळजे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here