कोपरगाव (स्वप्नील कोपरे) – जगतिक दर्जाचे ख्याती असलेले शिर्डी येथील श्री. साईबाबा मंदीर संस्थानच्या विश्वस्तपदी अहमदनगर जिल्हयातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगांव तालुकाध्यक्ष मनिष सुभाष जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी राज्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे साहेब व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आले. 

जगप्रसिध्द असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या  विश्वस्तव्यवस्थाच्या निवडीच्या हालचाली वेगाने सुरु आहे. लवकरच अधिकृत विश्वस्तव्यवस्थाची घोषणा करण्यात येणार आहे. यानिवडीत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून  मानल्या जाणा-या कोणत्याही पत्रकाराचा यात समावेश झालेला नाही. 

लोकशाहीत पत्रकारांची भुमिका ही अत्यंत महत्वाची असते  तळापासुन तर शासनाच्या महत्वाच्या भागापर्यंत पाठपुरावा करण्याची तयारी पत्रकारांची असते आपल्या बातम्या च्या माध्यमातुन पत्रकार सतत प्रशासनास योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शिर्डी येथील जगप्रसिद्ध श्री. साईबाबा मंदीर संस्थानच्या विश्वस्तपदी अहमदनगर जिल्हयातील कोपरगांव येथील अभ्यासु ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगांव तालुकाध्यक्ष मनिष जाधव यांची  राज्यातील पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

मनीष जाधव हे अनेक वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखनीतुन वाचा फोडली असून अनेक समजपयोगी प्रश्न आपल्या माध्यमातून मार्गी लावले असून परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील दांडगा अनुभव जाधव यांच्या पाठीशी आहेत तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या माध्यमातून देखील श्री. जाधव यांनी अनेक उपक्रम यशस्वी केले असुन सर्व  सामान्य व अभ्यासू पत्रकार मनिष जाधव यांना श्री. साईबाबा संस्थान विश्वस्तपदी संधी द्यावी अशी मागणी राज्यभरातील सर्व पत्रकार बांधवांच्या सोबतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here