श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आमच्या गाळ्याचे कुलूप तोडून त्यातील सामान कोठे ठेवले असे विचारण्यासाठी गेलेल्या महिलेस शिवीगाळ करुन, हात पिरगाळून तसेच साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

तसेच गाळ्याचे कुलूप तोडून गाळ्यातील मशिनरी व साहित्य चोरुन नेले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉर्ड नं. 7, काळाराम मंदिर व ब्रम्हे हॉस्पिटलसमोर फॅब्रिकेशनची टपरी होती. या जागेवर गाळे बांधण्याचे पालिकेने ठरवले. त्यानुसार या बांधकामाची जबाबदारी नगरपालिकेचे ठेकेदार शरद जगदाळे व तत्कालीन नगरसेवक अण्णासाहेब डावखर यांचेवर होती.

या बांधकामाचे पैसे आम्ही शरद जगदाळे व अण्णासाहेब डावखर यांच्या संयुक्तीक खात्यात सुरुवातीला 3500 रुपये टाकले होते. त्यानंतर 44 हजार रुपये रोख दिले होते. त्यानंतर 2014 मध्ये एमकेटी 786 हा गाळा शक्ती सिंग यास ठेकेदार शरद जगदाळे व नगरसेवक अण्णासाहेब डावखर यांनी दिला. या ठिकाणी शक्ती सिंग हा वेल्डींगचा व्यवसाय करत होता. त्यानंतर साईशक्ती फॅब्रिकेशन नावाचे वेल्डींग दुकान टाकले.

आमच्याकडे ताब्यात असलेला गाळा व कराची पावती भरत असतो. सदर पावतीवर गाळा 54 डी ब्लॉक यावर भोगवटादार म्हणून शक्तीराज प्रकाश सिंग यांचे नाव आहे. व सदर गाळा आमच्या ताब्यात आहे. सदर 54 ब्लॉकवर रवींद्र बारकू जाधव यांचेही नाव आहे. त्यावेळी रवींद्र जाधव यांनी उच्च न्यायालयात ठेकेदार शरद जगदाळे व नगरसेवक अण्णासाहेब डावखर यांचेविरुध्द दावा दाखल केला. आमच्या ताब्यात असलेला हा गाळा एक वर्षापासून बंद आहे. 17 जून 2021 रोजी शक्तीसिंग याने गाळा उघडण्यासाठी गेला असता कुलूप उघडलेले होते.

दुकानाचे नावही श्रीकृष्णा फॅब्रिकेशनचा बोर्ड लावलेला होता. गाळ्यातील आमची मशिनरी व साहित्य त्या ठिकाणी नव्हते. रवींद्र जाधव याने गाळ्याचे कुलूप तोडले असल्याचे शक्ती सिंग याने त्याची आईस सांगितले. त्यावर आई रवींद्र जाधव याच्याकडे जावून गाळ्याचे कुलूप का तोडले व त्यातील सामान कोठे आहे असे विचारले असता त्यावेळी रवींद्र जाधव याने शिवीगाळ करुन माझा हात पिरगळून, साडीचा पदर ओढला व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच धमकी दिली. रविंद्र जाधव याने रात्रीच्यावेळी मित्राच्या मदतीने आमच्या दुकानात असलेले मशिनरी व साहित्य असा एकूण 68 हजार 500 रुपये किंमतीचा माल चोरुन नेला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी रविंद्र बारकू जाधव व त्याचा अज्ञात मित्र दोघांविरुध्द भादंवि कलम 457, 380, 354, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here