श्रीरामपूर : कोरोना विरोधात लढण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या, कोरोना लसीकरणा करिता सर्वच स्थरातून भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील लोकमान्य टिळक वाचनालय याठिकाणी, ग्रामीण रुग्णालयाच्या पुढाकाराने, तसेच श्रीरामपूर नगरपरिषदच्या सहकार्याने लसीकरण केले जात आहे.

या लसीकरणा संदर्भात पालिकेतून ज्यांचे यादीत नाव नोंदविले आहे त्यांनाच, फोन करून लसीकरणास बोलविले जाते. परंतु लासीकरणा संदर्भात नागरिकांमध्ये असलेला गैरसमजामुळे, लसीकरणा साठी नाव नोंदवून देखील. मोठ्या प्रमाणात नागरिक येत नसल्याने, पालिकेच्या व ग्रामीण रुग्णालया कडून, शहरातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरणाकरिता बोलविले जाते, यामुळे लोकमान्य टिळक वाचनालया बाहेर जवळपास ५०० हुन अधिक युवक – युवती गर्दी करतांना समोर येत आहे. अशाच पद्धतीने आज दिनांक ४ जुलै २०२१ रोजी, पालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे हे, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यास, लोकमान्य टिळक वाचनालय येथे गेले असता.

सदरची गर्दी पाही ते थक्क झाले. करण त्या ठिकाणी शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून, कोरोनाची तिसरी लाट येऊ पाहत असतांना. लसीकरणाकरिता होत असलेली गर्दीमुळे, कोरोनाचे संक्रमण होण्याची शकता निर्माण झाल्याने. शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय व श्रीरामपूर नगरपरिषदेने लसीकरणा करिता टोकन सिस्टीम करून, वाचनालया बाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी पर्यटन करावे असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here