श्रीरामपूर/प्रतिनिधी :- राहाता तालुक्यातील चितळी येथील सुजित बाबासाहेब चौधरी (वय २३) या तरुणाने मानसिक छळास कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना २ जुलैच्या रात्री घडली. सदरची आत्महत्या  एका पोलिस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून करत असल्याची माहिती त्याने मृत्यूपूर्वी इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केली होती . त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती.

आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आज श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात तरुणांचे वडील बाबासाहेब चौधरी यांच्या फिर्यादी वरून ५ जुलै रोजी राहता तालुक्यातील चितळी जळगाव येथील गट क्र.७० हद्दीतील शेतीच्या वादातून माझ्या मुलाला वारंवार त्रास देत असल्यामुळे  सुजित बाबासाहेब चौधरी (वय २४ वर्ष) यांने  घराजवळच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. असल्याचे सुजित यांच्या वडिलांनी   श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दिली असून त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बाळासाहेब चौधरी, अनिकेत चौधरी, रविंद्र शेळके, प्रकाश केरुवाणी असे चौघा जणाविरूध्द गुन्हा रजिस्टर नं २०३/२१ ३०६,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व पोलिस निरीक्षक साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here