श्रीरामपूर(प्रतिनिधी)- राज्यात पावसाळी अधिवेशन ऑफलाईन होते मात्र श्रीरामपूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन ठेवली जाते. पालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्यासाठी अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सौ.खोरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आमदारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत मुंबई येथे पार पडले. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडी सदस्यांच्या थेट उपस्थितीत पार पडल्या. इतकेच काय तर नुकतीच पुणे महानगरपालिकेने सर्वसाधारण सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सभागृहात आयोजित केली. मात्र श्रीरामपूर नगरपरिषदेला प्रत्यक्ष ऑफलाईन सभा घेण्याचा विसर पडलेला दिसत असल्याचे खोरे यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षभरात झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभांमध्ये शहर विकासाच्या विविध विषयांमध्ये सदस्यांना बोलून न देणे, त्यांचे माईक बंद करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे येत्या १२ जुलै रोजी होणारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने सदस्यांना प्रत्यक्षात सभागृहात उपस्थित राहून घेण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here