राहाता/प्रतिनिधी :- शहरात आरोग्य विभाग कडुन ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण सुरु होते ते अतीशय व्यवस्थीत सुरु होते तेथेच लसीची कमतरता असताना खाजगी ठिकाणी लसीकरण सुरु केले आहे. आरोग्य प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे शहराच्या काही वार्डात खाजगी ठिकाणी लसीकरण सुरु केले त्या लसीकरणाच्या ठिकाणी सुख सोईचा मोठा आभाव प्रत्यक्षात तेथे होणारी मोठी गैरसोय तोंडपाहुन ट्रिटमेंट नियोजनाचा आभाव यामुळे लसीकरणात मोठा विस्कळीत पणा आलेला आहे. याकडे आरोग्य विभाग सोईस्कर पणे दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी दिली.

ते म्हणाले मुळतः शहरात सुरु असलेले लसीकरण हे सरकारी खर्चाने सुरु आहे सरकारी खर्चात फुकटात बॅनरबाजी करुन प्रसिद्धीसाठी हे विस्कळित वार्ड लसीकरण सुरु असल्याने सामान्य नागरिकांच्या मोठ्या असंतोषाला शहरातील आरोग्य विभागाला बळी पडावे लागत आहे त्यामुळे सामान्य नागरिक प्रशासनावर प्रश्नाचा मोठा भिडीमार करत आहे. शहरात सुरु असलेले लसीकरण हे शहरातील व शहरालगत असलेल्या आजुबाजुच्या गावातील नागरिकांसाठी सुरु आहे. त्यामुळे लसीकरणासाठी मोठी वर्दळ असते याकडे आरोग्य विभागाकडुन दुर्लक्ष सुरु आहे

शहरात व शहराच्या आजुबाजुला असलेले गावे कोविड च्या दृष्टीने सुरु असलेले शासनाच्या सर्व निर्बंधाचे पालन व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, कामगार, मजुर, आडचणीत असताना गंभीर परिस्थिती म्हणुन कशाची ही पर्वा न करता तंतोतंत करत आहे. त्यामुळेच प्रशासनाला मोठे सहकार्य होत आहे आणि त्यात सुरु असलेला लसीकरणाचा गोंधळ यातुन शहरातील नागरिक त्रस्त झाला आहे.

आज कोविड ची तिसरी लाट येण्याची शक्यता सरकार वर्तावत आहे त्या दृष्टीनेच सरकार कडुन योग्य ती खबरदारी घेवुन उपाययोजना सुरु आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांत मोठी चिंतेची बाब आहे जनमानसात लसीकरणाबाबत मोठी जागृती झाली असुन त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांना जर ग्रामीण रुग्णालय सोडुन वॉर्डात लस शोधत फिरावे लागत असेल तर ती मोठी अशोभनीय बाब आहे. तरी ग्रामीण रुग्णालय हे शहराच्या मध्यवर्ती असुन तेथे लस उपलब्ध राहणे आवश्यक असताना तेथेच लसीकरणाचा तुटवडा असुन  आरोग्य विभागाने जर वॉर्डात खाजगी ठिकाणी लसीकरण सुरु केले आहे. ही अतीशय चुकीची व गंभीर बाब आहे असे मत शहरातील लसीकरणावर श्रीकांत मापारी यांनी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here