राहुरी/प्रतिनिधी – तालुक्‍यात देवळाली प्रवरा येथे बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसाय सुरु होता. या अड्ड्यावर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकत दारूचे मिनी कारखानेच उद्‌ध्वस्त करून जवळपास पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे परिसरात कौतुक  होत आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, राज्य उत्पादन शुल्क विभाग व राहुरी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे  व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील ६ हजार २४० लिटर कच्चे रसायन, ११८ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू व २०० किलो नवसागर असा एकूण १ लाख ८२ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी आशाबाई बाळासाहेब गायकवाड, मयूर अनिल गायकवाड, सतिश वसंत गायकवाड, बापू भास्कर गायकवाड, मंगल बापू गायकवाड
आणि एका अज्ञाता विरोधात श्रीरामपूर पोलीस उपविभागाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार राहुरी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे तसेच राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, राज्य उत्पादन शुल्कचे उप अधीक्षक नितेश शेंडे, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here