शिर्डी/प्रतिनिधी :- शिर्डीतील नगर- मनमाड महामार्गावर रात्रीच्या सुमारास साईबाबा संस्थानचे कर्मचारी असलेल्या राजेंद्र धिवर यांच्यावर धार  शस्राने वार करून अज्ञात  हल्लेखोर पसार झाल्याची घटना घडली होती. गंभीर जखमी झालेल्या धीवर यांच्यावर साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योज मावळली त्यानंतर कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईकांनी रुग्णालयासमोर ठिय्या मांडून आक्रमक रूप घेत पोलिसांवर रोष व्यक्त केला तसेच जोपर्यंत आरोपी हजर करत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता मात्र शिर्डी पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन दिवसात आरोपी पकडू असे आश्वासन देत तुम्ही अंत्यविधी उरकून घ्या अशी विनंती केली मात्र त्यानंतर दहा दिवस होऊनही आरोपी सापडत नसल्याने धिवर कुटुंबीयांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 29/06/2021 रोजी सायंकाळी फिर्यादी श्री. संजय मधूकर पवार, वय- 41 वर्षे, धंदा- सेन्ट्रींग मजूरी, रा. राजगुरुनगर, शिर्डी, ता. राहाता हे त्यांचे मामाचा मुलगा राजेन्द्र आंतवन धिवर, रा. राजगुरुनगर, शिर्डी असे दोघे राहाता येथील मजुरांचे काम संपवून सायकलवरुन घरी जात असताना सायंकाळी 7/30 वा. चे सुमारास सायकल चालवून थकल्यामूळे राहाता-शिर्डी रोडवरील निसर्ग हॉटेल जवळ मोकळ्या जागेत बसलेले असताना दोन मोटार सायकलवरुन चार अनोळखी मुले त्यांचेजवळ आले व मोटार सायकली रस्त्याचे कडेला उभ्या करुन फिर्यादी व राजेन्द्र धिवर यांचेकडे येवून माचीस मागीतली, त्यावेळी राजेन्द्र धिवर याने त्याचे जवळील पिशवीमधून माचीस काढून सायकलचे सिटवर ठेवून सदर अनोळखी मुलांना घेण्यास सांगीतले. त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी त्यांचे हातातील कोणत्यातरी धारदार हत्याराने राजेन्द्र आंतवन धिवर याचे डोक्यावर, पोटावर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सदर आरोपी हे फिर्यादी यांना देखील “याला देखील पकडा व मारा” असे म्हणाल्याने फिर्यादी तेथून पळून गेले. सदर चार अनोळखी इसम हे राजेन्द्र धिवर याची हत्या करुन मोटार सायकलवरुन पळून गेले. सदर घटनेबाबत शिर्डी पो.स्टे. येथे गुरनं. 237/2021, भादवि कलम 302, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यांनतर मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीरामपूर, मा, उपविभागीय पोलीस अधीकारी सो, शिर्डी विभाग व पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्री. प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक, शिर्डी पो.स्टे. यांनी घटनास्थळी भेट देवून तसेच फिर्यादी यांचेकडे विचारपुस करुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेतली. तसेच सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी वेगवेगळे पथके तयार करुन तपासाबाबत सुचना दिल्या होत्या,व सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी गुन्हा केल्यानंतर कोणताही पुरावा मागे सोडलेला नव्हता, तसेच सदरचा गुन्हा उघडकीस आणणे हे मोठे आव्हान असल्याने श्री. संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग व पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/सोमनाथ दिवटे/पोसई/ गणेश इंगळे, पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, सुनिल चव्हाण, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के दिपक शिंदे, सचिन आडबल, पोकॉ/रविन्द्र घुंगासे,संदिप चव्हाण, संदीप दरंदले, रोहित येमूल, सागर ससाणे, रणजित जाधव, प्रकाश वाघ, राहूल सोळूंके, मेघराज कोल्हे, चालक पोहेका/उमाकांत गावडे, अर्जुन बडे, भरत बुधवंत तसेच शिर्डी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक/प्रविण लोखंडे, सपोनिदिपक गंधाले,सपोनिप्रविण दातरे, पोसई/बारकू जाने, पोना/सुरेश क सास कुऱ्हाडे, पोकॉ/प्रमोद पळसे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे कार्यालयातील यांची वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला.

सदरचा गुन्हा हा तत्कालिन कारणावरुन घडलेला असल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत असल्याने गुन्ह्याचा चोहोबाजूने तपास करीत असताना तपासामध्ये सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांचे. चाळीस ठिकाणचे सीसीटीव्ही. फुटेज प्राप्त केले. त्यावरून आरोपी, मोटार सायकल व त्यांचा मार्ग निश्चित करण्यात आला, फुटेजमधून आरोपींचे चेहरे, वाहनांचे नंबर स्पष्टपणे दिसून येत नसल्याने सदर सी. सी. टी. व्ही. फुटेजचे तांत्रीक विश्लेषण करून त्यातुन आरोपीचे फोटोची स्पष्टता करून सदरचे संशयित आरोपीतांचा येण्याजाण्याचा मार्ग हा नाशिक पर्यंत असल्यांचे तपासात निष्पन्न झाले आरोपी हे नाशिक येथील असल्याची खात्री झाल्यांने तपास पथकाने आरोपीतांचे फोटो व मो.सा चे वर्णन व त्यांनी केलेल्या गुन्हा बाबतची माहिती नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेला कळविण्यात आली.

नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असतांना नाशिक गुन्हे शाखेने आरोपी नामे 1) राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे, वय. 19 वर्षे, रा. पाथर्ही गाव, सुखदेव नगर, नाशिक, 2) अविनाश प्रल्हाद सावंत, वय- 19 वर्षे, रा. पाथर्डी गाव, नाशिक यांना ताब्यात घेतले व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडे हस्तांतरीत केले. आरोपींना शिडी पोलीस’ ठाणे येथे आणुन त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता तेउडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांचेकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा अमोल लोंढे, रा, शिर्डी याचे सांगणेवरुन हसीम खान, रा. नालासोपारा, ठाणे, कुलदीप पंडीत, रा. पाथर्डी गांव, नाशिक, गॅस उर्फ साहिल शेख, रा. मोरवाडी, नाशिक व  साहिल पठाण, रा. पाथर्डी गांव, नाशिक यांचेसह केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेतला. परंतू सदरचे आरोपी मिळून आले नाही

सदरचा गुन्हा अमोल लोंढे याचे सांगणेवरुन केला असल्याची माहिती आरोपींनी दिल्याने 3) अमोल सालोमन लोढे, वय- 32 वर्षे, रा. कालिका नगर, शिर्डी यास शिर्डी येथून तपास पथकाने ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने मयत राजेन्द्र धिवर याचे समवेत गेल्या दहा ते बारा वर्षापासून वाद चालू होते, राजेन्द्र धिवर हा नेहमी त्रास देत होता. त्याबाबत सन 2013 मध्ये शिर्डी पो.स्टे. येथे तक्रार दिलेली होती. परंतू त्यानंतरही राजेन्द्र धिवर हा नेहमी त्रास देत होता. त्या कारणावरुन मित्र अरविंद सोनवणे, रा. शिर्डी याचे ओळखीने राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व त्याचे साथीदारांना 4,00,000/-रु. सुपारी देवून त्यांचेकरवी राजेन्द्र धिवर याचा खून केला असल्याचे सांगीतले. त्यावरुन आरोपी अरविंद सोनवणे याचा शोध घेवून आरोपी नामे 4) अरविंद महादेव सोनवणे, वय- 19 वषे, रा. श्रीरामनगर, शिर्डी यांस शिर्डी येथून तपास पथकाने ताब्यात घेवून वरील नमुद चार आरोपींना शिर्डी पो.स्टे. येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही शिर्डी पो.स्टे. हे करीत आहेत, आरोपी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व अविनाश प्रल्हाद सावंत यांचे विरुध्द यापुर्वी नाशिक येथे खालील प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल आहे.

1) इंदीरानगर पो.स्टे. नाशिक शहर गुरनं. 1 73/2019, भादवि कलम 302, 43, 147, 148, 149

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, श्रीमती डॉ दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री, संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग, अ.नगर यांचे सुचना व अधीकारी, स्थानिक गुन्हे शाखा, शिर्डी पो.स्टे. ब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here