श्रीरामपूर (प्रतिनिधी संदिप आसने) मुळा‌-प्रवरा संस्‍थेच्‍या माध्‍यमातून पाच वर्षे कारभार करताना व्‍देषविरहित आणि सहकारी संस्‍था टिकावी म्‍हणूनच निर्णय केले. या माध्‍यमातून कामगारांना न्‍याय देता आल्‍याचे समाधान आहे. भविष्‍यात ही सहकारी संस्‍था सुरू व्‍हावी याच भावनेतून काम करण्‍याची ग्‍वाही संस्थेचे अध्यक्ष खा.डॉ. सुजय विखे यांनी दिली.

मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्‍थेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेचा मागील पाच वर्षांच्या काळातील लेखाजोखा खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी संस्थेच्या श्रीरामपूर कार्यालयात पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन जी के बकाल यांच्या कमतरतेची खंतही व्यक्त केली.राजकीय षडयंत्रातून ही संस्‍था बंद झाल्‍यानंतर ज्येष्ठ नेत्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली न्‍यायालयीन लढाई अद्यापही सुरू आहे. संस्‍थेच्‍या प्रगतीसाठी झटणारा कामगार यामुळे देशोधडीला लागला होता अशा कामगारांना आमच्‍या संचालक मंडळाच्‍या कार्यकाळात न्‍याय देता आला याचा अभिमान आहे. मागील पाच वर्षांची सत्ता जशी कामगारांसाठी उपयोगात आणली, तशी ही संस्‍था पुन्‍हा सुरू व्‍हावी याकरिता संघर्षातच गेली असल्‍याचे खा. विखे यांनी सांगितले. तसेच भविष्यात होणाऱ्या मुळा-प्रवरा संस्थेच्या निवडणुकीसाठी संस्थेचे ५० हजार सभासद मतदानासाठी पात्र आहेत तसेच जेव्हा कधी निवडणूक जाहीर होईल त्या तारखेपर्यंत जे सभासद थकबाकीची रक्कम भरतील ते सर्व सभासद निवडणुकीला पात्र राहतील कुठल्याही प्रकारे कोणत्याही सभासदाचा मतदानाचा हक्क हा शेअर्सच्या रकमेपोटी उडवला जाणार नाही तसेच संस्थेच्या या पाच वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही सभासदाला संस्थेच्या शेअरची रक्कम भरा अशी एकही नोटीस दिलेली नाही.तसेच बंद पडलेल्या संस्थेत अनेक न्यायप्रविष्ट विषय आहे अशात राजकारण होऊ नये आणि संस्था पुन्हा सुरू व्हावी यासाठी मागील काळात संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्व.जयंतराव ससाणे यांच्याशी समन्वय साधून निवडणूक बिनविरोध केली त्याचप्रमाणे आता देखील आमचा सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न राहील.तसेच विखे कुटुंबीयांनी संस्थेला वाचविण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते संस्थेच्या कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना माहिती आहेत. तसेच ज्या कोणत्या सभासदांना मतदानासाठी पात्र व्हायचे असेल अशा सभासदांनी थकबाकीची रक्कम ते सभासद देखील मतदानास पात्र होतील असे आवाहन यावेळी संस्थेचे अध्यक्ष खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी यावेळी केले.

मुळा प्रवरा संस्थेने कोविड काळात ६५ लाख खर्च करून कार्यक्षेत्रात अन्नछत्र चालविले तसेच पंतप्रधान सहायता निधीसाठी २५ लाख दिले.संस्थेच्या मागील ५ वर्षाच्या काळात मा न्यायालयाचा एकही निकाल संस्थेच्या विरोधात गेला नसल्याचे समाधान यावेळी खा.डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here