श्रीरामपूर : नगर दक्षिणेचे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, यांच्या दक्षिणेतील दौ-या नंतर. त्यांनी मुळा प्रवरा वीज संस्थेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने. श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा संस्थेचे संचालक, कार्यकर्ते व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दक्षिणेतील कामकाजा संदर्भातील आढावा देतांना, खासदार दिसण्यापेक्षा त्याचे काम दिसणे गरजेचे असते असे सांगत. शिर्डी लोकसभा मतदार संघातील आमदार खासदारांच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत. कदाचित आमदार आणि अधिकारी एकामेकाशी वाटेकरी आहेत, अशी शंका उपस्थित करून, महाविकास आघाडी सरकार मधील लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. त्याच बरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात बोलतांना, आता सगळेच जोश मध्ये आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकी नंतर या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरेल, आणि भविष्यात काळ ठरवेल की कोण सारर्स ठरेल व जनता कोणा सोबत आहे हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. श्रीरामपूर पालिका निवडणुकी संदर्भात विचारल्या असता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेसह मित्र पक्षांनी महाविकास आघाडी केल्यास, अनेक उमेदवार आमच्या गळाला लागणार आहेत, तेव्हा सर्व घटक पक्षांसोबत चर्चा करून, निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवायची की कोणत्या इतर चन्हवर लढवायची, हे स्थानिक नेते ठरवतील, अशा शब्दात मागणी निवडणुकीत भाजप संपूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे संकेत, यावेळी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी दिल्याने, अनेक कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून. डॉ सुजयदादांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खा डॉ सुजयदादांच्या बैठकी वेळी शहरातील काही नगरसेवक देखील, आगामी काळातील राजकीय रूपरेषा ठरविण्यासाठी उपस्थित राहिल्याने, शहरातील राजकारणात तिस-या आघाडीच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. सदरच्या या बैठकीत वेळीस जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पटारे, भाजपचे प्रकाश चित्ते, नानासाहेब शिंदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विशाल यादव आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here