श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर नगरपालिकेच्या पार पडलेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवावा म्हणून २४ नगरसेवकांनी विशेष सभा घ्यावी ही मागणी केलेली असतानाही विशेष सभा न घेणाऱ्या सत्ताधारी गटाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला. प्रभागातील गटारींच्या दुरुस्तीचे, चरावर पाईप टाकण्याच्या कामाचे पत्र देऊनही कामे केली जात नाही मात्र रिकाम्या प्लॉट, रिकाम्या बिल्डिंग पुढे रस्ते, पाईप टाकण्याचे पाप केले जाते ? याचा खुलासा मागितल्यावर नगराध्यक्षा अनुराधा आदिकांनी स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत सगळीकडे काम करत असल्याचे सांगितले. यावर खोरे यांनी आक्रमक भूमिका घेत पूर्णवादनगरच्या नागरिकांचे पावसात होणारे हाल दिसत नाही का? तिथे तुम्ही कधी आल्या का ? एखाद्या पावसात येऊन बघा असे अध्यक्षांना सुनावले या प्रकरणावरून नगराध्यक्षा अनुराधा आदिक व नगरसेविका स्नेहल खोरे यांच्यात ऑनलाइन सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाल्याचे बघायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here