श्रीरामपूर/प्रतिनिधी :- राहता तालुक्यातील पुणतांबा येथे योगेश अलंकार या दुकानात शटरचे कुलूप तोडून सत्तेचाळीस हजारांची चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
     
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणतांबा येथील महेश अरुण मैड वय ३८ धंदा सोनार यांच्या मालकीचे योगेश अलंकार या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ४७ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला असून यामध्ये १२ हजार रुपयांचे १५० ग्राम चांदीचे दागिने,३५ हजारांचे ७ ग्रॅम सोन्याच्या मुरण्या,२ ग्रॅम कानातील टॉप्स चोरीला गेले आहे.याप्रकरणी महेश मैड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १७६/२०२१ नुसार भादवी कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दिलीप मंडलिक हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here