श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार शिव संपर्क अभियानाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रभर चालू झाली आहे त्याचे औचित्य साधून आज श्रीरामपूर शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान याची सुरुवात श्रीरामपूर व्हीआयपी गेस्ट हाऊस याठिकाणी नामदार मृद व जलसंधारण कॅबिनेट मंत्री नामदार शंकरराव गडाख शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे, शहर प्रमुख सचिन बडदे तसेच तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख प्रदीप वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी कोरोना  च्या काळात शिवसेनेने तळागाळातील लोकांसाठी कसे काम केले ते काम करताना अनेक शिवसैनिक यांना आपला प्राण गमवावा लागला त्यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे तसेच व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख मदनलाल बत्रा यांनी ही प्राण गमावला त्यांच्यासह शिवसेनेतील अनेक परिवारातील तसेच समाजातील ज्या लोकांचे करणाने निधन झाले त्या सर्वांना प्रथम कार्यक्रमांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांनी येऊ घातलेल्या नगरपालिकेच्या मतदानामध्ये नामदार शंकरराव गडाख यांच्यासह सर्व प्रमुख लोकांनी लक्ष घातले तर येऊ घातलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा आम्ही निश्चित फडकवून दाखवू असे आश्वासन सुद्धा शहर प्रमुख सचिन बडदे यांनी दिले

त्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेना हा श्रीरामपूर तालुक्यातील दोन नंबरचा पक्ष असून जर नामदार साहेब यांनी श्रीरामपूर तालुक्याला जर ताकद दिली तर येऊ घातलेल्या नगरपालिका पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे सर्व ठिकाणी भगवा फडकवून दाखवू असे आश्वासनही माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी यावेळी भाषणात दिली तसेच खंडकर यांचा जो प्रश्‍न प्रलंबित आहे अनेक वर्षापासून त्यातही लक्ष घालून तो मार्गी लावावा तसेच आपल्या तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत जसे जलसंधारण त्यावरही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख करून ते सर्व सोडवावेत असे आवाहन केले 

सदर शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे कसे चांगले काम करत आहे व ते खेडोपाडी आणि सर्व शहरात कसे प्रसिद्ध आहे त्याबद्दल आपले मत मांडले त्यानंतर येऊ घातलेल्या पूर्ण नगरपालिका श्री ग्रामपंचायती असतील सर्व इलेक्शन मध्ये मी खंबीरपणे शिवसैनिकांच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले त्यानंतर आपल्या प्रमुख भाषणात जल व संधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नव्हती पण ते कोणत्या अवस्थेत मुख्यमंत्री झाले यावर संभाषण केले तसेच मागील पाच वर्षात शिवसेनेला भाजप विषयी कसा कटू अनुभव आला व त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असे शिवसैनिकांना जाहीरपणे सांगितले बाकीचे पक्ष इलेक्शन जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करत असतात परंतु उद्धवजी ठाकरे हे असे मुख्यमंत्री होते की ज्यांनी सत्तेत आल्या आल्या पहिल्यांदी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तसेच अनेक धडाडीचे निर्णय ते घेणारच होते परंतु धोरणामुळे अनेक गोष्टींना संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले परंतु त्याही काळात त्यांनी बाकीच यांसारखे थाळ्या वाजवा काठ्या वाजवा वर वाढवा असे कोणत्याही प्रकारचे नाटक न करता कोरोना काळात आपण जे सरळ काम करून कोरूना वर कसे नियंत्रण मिळवू शकतो हे साध्या आणि सोप्या भाषेत दर चार ते पाच दिवसांनी जनते समोर येऊन जनतेशी घरातील एका मेंबर सारखे मार्गदर्शन करून जनतेला सांगितले त्यामुळेच आज महाराष्ट्रात कोरूना आटोक्यात आला असें आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले तसेच इथून पुढील काळात शिवसेना वाढवण्यासाठी मी काही गोष्टी न बोलता कृतीतून करून दाखवेल आणि मगच लोकांसमोर जाईल असे सांगण्यासही ते विसरले नाही तसेच प्रत्येक शिवसैनिकांनी घराघरात पोहोचवणे प्रत्येक वार्डात प्रत्येक गावात पोचून शिवसेना घरोघरी पोहचवावी असे सुद्धा नम्र आवाहन त्यांनी सर्व शिवसैनिकांना केले.

या सर्व कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शिवसेनेतील अनेक लोकांनी प्रवेश केलेले व अनेक नवीन लोकांच्या अनेक पदावर नियुक्ती करण्याचे पत्र ही प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत देण्यात आले त्यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी सर्व शिवसैनिकांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असे जाहीर केले या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे, शहर प्रमुख सचिन बडदे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख शुभांगी ताई शेटे, शहर प्रमुख सौ रेखा किशोर फाजगे, क्षीरसागर मॅडम, युवा सेनेचे सचिव भैया तिवारी, कोपरगावचे शहर प्रमुख, कलविंदर दडियाल, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख, जिल्हा संघटक डॉक्टर शिरसागर, उपतालुका प्रमुख प्रदीप वाघ , शरद भणगे, युवा सेनेचे शहरप्रमुख निखिल पवार, कामगार हृदय सेनेचे जिल्हा प्रमुख सोमनाथ गोरे, उपजिल्हाप्रमुख बोरकर काका, ज्येष्ठ शिवसैनिक यासीन भाई सय्यद, सदा कराड मामा, अशोक थोरे, उपशहर प्रमुख गोटू शिंदे, आशिष शिंदे, रोहित भोसले, विजू बडाख, किशोर फासगे, रमेश घुले, दिनेश पोपळघट, राहुल रणधीर, आशिष शिंदे, एकनाथ गुलदगड, युवासेना दीपक संत, सतू महाराज गौड, प्रतिक यादव , प्रतिक गारुळे, ऋतिक यादव, सागर विधाटे, विवेक फोपसे, ओमकार वेवहारे, मयुर डोखडे, अविनाश दिवटे, भाऊसाहेब वाणी, सोमनाथ शिंदे, संतोष पोखरे, संजय वाघमारे, शरद भणगे, मार्गदर्शक विठ्ठलराव फरगडे, भैरव कांगणे, सरपंच शिवाजीराव शेजुळ किशोर कांबळे , सुखदेवराव नवले, पोपट भालेराव, बाळासाहेब ढोकचौळे, किशोर पाटील ढोकचौळे, मयूर ढोकचौळे, लहानु त्रिभुवन, रामा अग्रवाल, रामपाल पांडे आबा बिरारी,भावेश टक्कर , हीरण गुप्ता ,सुधीर वायखिंडे, गणेश शिंदे, कैलास पुजारी, निलेश पाटनी, शुभम टाके, अक्षय कोकणे, गणेश सोनवणे राहुल इंगळे, बजरंग जंगम, प्रसाद सरोदे, सागर शिंदे, विशाल शिंदे, राहुल गायकवाड, महेश कुलकर्णी, अमोल ओमनी, सुनील गायकवाड, शरद डोळसे, प्रसाद टेकाळे, राधाकृष्ण वाघोली, राजेश तांबे, पांडुरंग व्यवहारे, किशोर बनसोडे, बाळासाहेब दुधाडे, बहिरू ठाकर यांच्यासह अनेक शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here