श्रीरामपुर :- कोरोना महामारीमुळे अनेक नागरीकांचे व्यवसाय बंद पडलेले आहे याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने विद्यालय व महाविद्यालयांनी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक फी घेऊ नये. शासनाच्या वतीने फी माफ करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी केले असतांना काही विद्यालय व महाविद्यालय फी ची मागणी करत
आहेत. व काही विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे त्यांना गुणपत्रक नाकारत आहेत. तर काही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश नाकारत आहेत. असे एक-ना अनेक अटी व शर्ती लावून विद्यार्थ्यांना नाहक त्रास देऊन त्यांची पिळवणूक करुन आर्थीक लुट करुन शिक्षण मंत्र्यांच्या व सरकारच्या आदेशाला न जुमानता स्वत:च्या फायद्यासाठी मनमानी कारभार सुरु आहे. अशा कायद्याला न जुमानणाऱ्या विद्यालये व महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई करून गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा. अशा अश्यायचे निवेदन गटशिक्षणाधिकारी श्री दिवे यांना देण्यात आले व सदर निवेदनाची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे
याप्रसंगी जिल्हा सचिव तुषार बोबडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, मनविसे शहराध्यक्ष विशाल शिरसाठ आदी मनसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते