श्रीरामपूर/प्रतिनिधी :-  तालुक्यातील बेलापूर गावात घराचे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणारांना एक हंडा सापडला त्यांनी तो मालकास सांगीतला त्यांनी तो माल ताब्यात घेतला असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभाग ते गुप्तधन आज ताब्यात घेणार होते                                 

या बाबत हाती आलेली माहीती अशी की बेलापुरगाव ही जुनी व मोठी बाजारपेठ होती त्या काळी धन हे सोन्याच्या स्वरुपात जमा करुन जमिनीत पुरुन ठेवले जात असत  गावात असे अनेक जुने वाडे आहे  अशाच एका जागेचे खोदकाम काही मजुर करत होते त्यांना अचानक खोदताना काहीतरी वस्तू असल्याचे जाणवले त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता एक हंडा निघाला त्यात बरेच सोने चांदी भरलेले होते तो हांडा घरमालकाने ताब्यात घेतला या बाबत खोदाकाम करणारांना काही अमिष दाखविण्यात आले होते

परंतु ते पुर्ण न झाल्यामुळे गुप्तधनाचे बिंग फुटले अन या गुप्तधनाचा गावभर नव्हे जिल्हाभर  बोभाटा झाला संबधीतांनी या ठिकाणी चांदी सापडली असल्याचा जिल्हाधिकारी यांना कळविले असुन काही चांदी घेवुन संबधीत नगरला गेले आहेत परतु   जिल्हाधिकारी हे पुरातत्व विभागाला आदेश करतील त्या नंतर महसुल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करुन ते धन महसुलच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगीतले होते

त्या अनुषंगाने आज या गुप्तधनाचा श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील,पोलीस आणि कोषागारच्या अधिका-यांनी, खटोड यांच्या घरी येवुन सरकारी पंचानसमोर हा हंड्याची मोजमाप करत, सापडलेले गुप्तधन ताब्यात घेतले, ज्यात राणी व्हिक्टोरिया यांच्या काळातील ११ किलो चांदीची १०४६ चांदीचे शिक्के, तसेच राणीच्या काळातील १ रुपयाचे ९१५ नाणी व इतर चार आणे व आठआणेचे नाणी आढळून आले आहेत. बेलापुर या गावात सिंधु संस्कृती सारखी वसाहत सापडलेल्या, दायमाबाद संस्कृती शेजारी वसलेल गाव आहे. तसेच ह्या ठिकाणी अनेक पडकी वाडे असल्याने याठिकाणी कायम धन सापडत असल्याची चर्चा असते, मात्र आज प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या वस्तूं मधील काही वस्तू गायब झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्याने, प्रशासनाने ज्या कामगार समोर हे धन सापडल त्यांना पंच का घेतले नाही, आणि त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल देखील उपस्थितीत केला जातोय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here