श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरात वार्ड नंबर 2 मध्ये जैनब मज्जिद येथे सरफराज शेख याच्याकडे गावठी कट्टा मिळाल्याची घटना काल घडली होती. ही कालची घटना ताजी असतानाच श्रीरामपूर शहरात नॉर्दन ब्रँच दहाव्याच्या ओट्यापाशी दोन आरोपींना दोन गावठी कट्टे व ०७ राऊंड सह नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १४/०७/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अनिल कटके अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, दोन इसम हे गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी नॉर्दन ब्रँच, दहाव्याचा ओटा, श्रीरामपूर येथे येणार आहेत. आता तात्काळ गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी श्रीरामपूर परिसरात पाहिजे व फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमी नुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ/मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना/ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, पोकॉ/रविन्द्र घुंगासे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहित येमूल, चालक पोहेकॉ/बबन बेरड अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी दहाव्याचा ओटा, नॉर्दन ब्रँच, वार्ड नं. ७, श्रीरामपूर येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच दोन इसम हे दहाव्याचा ओट्या जवळ येवून सदर ठिकाणी थांबून संशईत नजरेने इकडे तिकडे पाहू लागले. त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेवून त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे पत्ते ९) प्रेम पांडूरंग चव्हाण, वय- ३७ वर्षे, रा. बाजारतळ, दुबे गल्ली, वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर, २) आकाश राजू शेलार, वय- २९ वर्षे, रा. चितळी, ता. राहाता असे असल्याचे सांगीतले. त्यांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये दोन गावठी बनावटी कट्टे व सात जिवंत काडतूसे असे एकूण ६३,५००/-रु. किं. गावठी कट्टे व जिवंत काडतूसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले.

वरील नमुद दोन्ही इसम नामे १) प्रेम पांडूरंग चव्हाण, वय- ३७ वर्षे, रा. बाजारतळ, दुबे गल्ली, वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर, २) आकाश राजू शेलार, वय- २९ वर्षे, रा. चितळी, ता. राहाता हे दोन गावठी कट्टे व सात जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोहेकॉ/२१४५ मनोहर सिताराम गोसावी, नेम- स्थानिक गुन्हे शाखा, अ.नगर यांनी श्रीरामपूर शहर पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ग ४६७/२०२१, आर्म अँक्ट कलम ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पो.स्टे. करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती डॉ. दिपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here