राहता/प्रतिनिधी :- राहता नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजाचा गोडावून मध्ये ठेवलेल्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे राहता नगरपरिषदेचे तात्काळ मुख्याधिकारी नगराध्यक्षा नगरसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासंदर्भात प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन देण्यात आले

गेल्या काही वर्षा पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका धान्याच्या गोडावून मध्ये डांबून ठेवला असून हा पुतळा मुक्त करावा यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 जुलै रोजी राहता नगरपरिषदेच्या मुख्यधिकारी यांना घेराव घालून निवेदन दिले असता मुख्यधिकारी यांनी 2 दिवसात पुतळ्या विषयी संपूर्ण माहिती देतो असे आश्वासन दिले 10 दिवसांनी अखिल भारतीय छावा संघटना माहिती घेण्या करीत राहता नगरपालिकेत आले असता माहिती तयार करण्याचे काम चालू आहे थोडावेळ थांबा असे सांगितले परंतु सुमारे 2 तास बाहेर उन्हामध्ये बसून देखील माहिती न भेटल्याने अखिल भारतीय संघटना माहिती घेण्या करता मुख्याधिकारी यांच्याकडे गेले असता मुख्याधिकारी यांनी नागरपालिकेतून पळ काढला व नगरपालिकेचे कर्मचाऱ्याना माहिती पत्रक देण्यास सांगितले परंतु मुख्याधिकारीच्या हातून माहिती पत्रक घ्यायचे असल्याचे छावा संघटनेचे कार्यकर्ते यांनी नगरपालिकेच्या कर्मचारीस सांगितले असता मुख्याधिकारी काही वेळात येतील 5 मिनटं बसा असे उत्तर कर्मचाऱ्याकडून मिळाले परंतु अर्धा तास उलटून देखील मुख्याधिकारी कार्यालयात न आल्याने अखिल भारतीय छावा संघटनेला मुख्याधिकारी यांच्या कार्यालय बाहेर ठिय्या मांडावा लागला ह्या सर्व घटनेला कंटाळून मुख्याधिकारी यांचा निषेध करून बांधकाम विभागाचे अशोक ताजवे यांचा हस्ते माहिती पत्रकाचा स्वीकार करण्यात आला

छत्रपती शिवाजी महारांचा पुतळा पांढऱ्या कापडाने झाकून तसेच सुरक्षित भिंती बांधून बंद ठेवलाय असे माहिती पत्रकात लिहून दिली होती परंतु प्रत्यक्षात पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला कुठल्याही प्रकारचे पांढरे कापडाने तसेच त्याची कुठलीही साफसफाई केली जात नाही अशी खोटी माहिती देऊन पुतळ्याची विटंबना केली जात आहे त्या अनुषंगाने सदर दोषीं मुख्यधिकारी चंद्रकांत चव्हाण नगराध्यक्षा ममता पिपाडा तसेच नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करावी याकरिता प्रांताधिकारी व तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, सुहास निर्मळ, अतुल चौधरी, शरद बोंबले, ताराचंद राऊत, मनोज होंड, महेश लहारे, प्रथमेश राऊत, सुरेश ठोके, सुभाष कापसे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here