श्रीरामपूर (प्रतिनिधी)  सोनगाव प्राथमिक उपकेंद्रात लसीकरण सुरु झाल्या पासून मोजक्याच लसीचे डोस उपलब्ध होतात.वय वर्ष ४५ च्या वरील नागरिकांनाच अजून लस मिळालेली नसून अजून १८ वर्षावरील नागरिकांना डोस देणे बाकी आहे.काही विद्यार्थ्याना कॉलेज मध्ये लसीकरण झाल्याशिवाय येऊ दिले जात नाही आशा विद्यार्थांचे तसेच पालकांचे पण फार हाल होत आहेत तरी सोनगाव पंचक्रोशीतील दोन्ही उपकेंद्रा करिता जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस उपलब्ध करून द्यावे.तसेच लसीकरणबाबत पारदर्शकता यावी.विद्यार्थीचे व पालकांना विनाकारण ञास होऊ नये यासाठी प्रशासनाला सुचना कराव्या.सोनगाव साञळ येथील धानोरे येथील नागरिकांना सोनगाव व साञळ प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण व्हावे विनाकारण जेष्ठ नागरिक व अपंगाना विनाकारण गुहा येथे  लसीकरणासाठी बोलाऊन ताटकळत ठेऊ नाही यासाठी तेथिल आरोग्य अधिकारी यांना सुचना कराव्यात या आशयाचे निवेदन सोनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच किरण पाटील अंञे यांनी माजी मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.यावेळी सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप,साहेबराव अनाप  प्रवरा कारखान्याचे संचालक सुभाष पा अंञे,उत्तम दिघे साञळचे सरपंच सतिष ताठे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुभाष डुक्रे,प्रशांत अंञे,सुर्यभान शिंदे, विनोद अंञे,मुळा प्रवराचे मा संचालक सुभाष पा अंञे, मच्छींद्र अंञे,पाराजी धनवट सर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here