रांजणखोल(वार्ताहर)महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यभरात १५ जून ते १५ जुलै २०२१  या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ राबवण्यात येत आहे या मोहीमेअंतर्गत राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे उमेदच्या महिला बचत गटांमार्फत  सेंद्रिय पोषण परसबागा तयार करण्यासाठी आखणी करण्यात येवुन माझी परसबाग विकास मोहिमेचा शुभारंभ राहाता तालुका बाजार समितीचे संचालक जेष्ठ नेते अंबादास पाटील ढोकचौळे यांच्या हस्ते करण्यात आला

या परसबागेसाठी विषमुक्त भाजीपाला तयार होण्यासाठी बी-बियाणे पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या शेतामधुन आणण्यात आले आहे सरपंच चांगदेव आण्णा ढोकचौळे यांनी स्व खर्चाने रांजणखोल परिसरातील परसबागेसाठी बी-बियाणे उपलब्ध करून दिले आहे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, फळभाज्या, औषधी वनस्पती या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राहाता तालुका प्रभाव समन्वयक पठारे यांनी दिली करोनामुळे शहरी व ग्रामीण भागातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागामध्ये पोषण आहाराचा प्रश्‍न बिकट झाला आहे रासायनिक खतांच्या वापरातून उत्पादित भाजीपाला बाजारात मिळतो त्याचे भावही अव्वाच्यासव्वा असतात त्यावर पर्याय शोधून ग्रामीण भागातील लहान मुले, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांना आहारामध्ये पोषकद्रवे मिळावी कमी खर्चामध्ये पोषक, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित फळभाज्या, पालेभाज्या व औषधी वनस्पती त्यांच्याच गावात दररोज उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद, अहमदनगर व उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या मार्फत माझी पोषण परसबाग विकसन मोहीम सुरु करण्यात आली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून उमेदच्या बचत गट, ग्रामसंघ यांच्यामार्फत समुदाय स्तरीय पोषण परसबाग व प्रती कुटुंब वैयक्तिक पोषण परसबाग तयार करण्यात येणार असून या परसबागेमध्ये सुरुवातीच्या सात वाफ्यामध्ये पालेभाज्या व अन्य सात वाफेमध्ये फळभाज्या तसेच परसबागेच्या कडेला वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यात आली आहे या उपक्रमामुळे कुटुंबाला वर्षभर विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावरून कृतीसंगम विभागांतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभाग समन्वयक, तालुका व्यवस्थापक हे गाव पातळीवर याचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहे या मोहिम परसबाग शुभारंभ प्रसंगी जेष्ठ नेते अंबादास पाटील ढोकचौळे, सरपंच चांगदेव आण्णा ढोकचौळे, उपसरपंच सविता बागुल, ग्रामसेवक बबनराव बहिर, पोलिस पाटील कृष्णा अभंग, बाळासाहेब ढोकचौळे, निलेश जाधव, प्रभाव समन्वयक पवन पठारे,माजी सरपंच मनिषा अभंग, ग्रा.पं. सदस्य निर्मला जाधव, सी.आर.पी.स्नेहल जाधव, सुवर्णा गिरमे यांच्यासह बचत गटाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here