श्रीरामपूर : तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील लक्ष्मण चांगदेव भागवत वय वर्ष ३०, या युवकाने गावातील सुरेश हरिभाऊ सवई नावाच्या इसमाकडून, शेतीकरिता ५ रुपये शेकड्या प्रमाणे साडे १३ लाख रुपये घेतले होते, घेतलेल्या पैशांची वेळोवेळी व्याजासह परत फेड करुन देखील. लक्ष्मण भागवत सुरेश हरिभाऊ सवाई यांचा मुलगा सतीश सुरेश सवई , योगेश सुरेश सवई या दोघांनी, लक्ष्मण चांगदेव भागवत या युवकास श्रीरामपूर नेवासा मार्गावरील उड्डाणपुलावर गाठून, तू आमच्या विरोधात पोलिसात तक्रार देतो का ?, असे म्हणत भागवत यास मारहाण करवून, तुझे हातपाय तोडू अशी धमकी दिल्याने, लक्ष्मण भागवत या युवकाने श्रीरामपूर शहरातील नेवसा रोड परिसरात असलेला,औद्योगिक वसाहतीत १४ जुलैच्या दुपारी १२ वाजेच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदरचा प्रकार लक्षात आल्याने परिसरातील काही नागरिकांनी, भागवत यास साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यास माहिती मिळताच, पोलिसांनी सदर युवकाचा जबाब घेऊन, आरोपीं विरुद्ध भादवी कलम ३८४,३४१,३२३,५०४,५०६ गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस नाईक दुधाडे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here