श्रीरामपूर/प्रतिनिधी :-  तालुक्‍यातील बेलापूर या गावाला खूप जुना इतिहास आहे. या गावात अनेक जुने वाडे आहेत. अशाच एका ठिकाणी राहणारे राजेश खटोड यांच्या जुन्या वाड्याच्या पाठीमागे गार्डन मध्ये झाडे लावण्याचे कामासाठी खोदकाम चालु असतांना एक तांब्याचा हंडा सापडला त्यामध्ये वर चांदीचे नाणे व खाली सोन्याचे नाणे होते व सदर हंडा चार लोकांना ही उचलत नव्हता असे खोदकाम करणाऱ्या मजुरांनी ऐका स्थानिक टी.व्ही. चॅनलला मुलाखत देतांना सांगितले. ही मुलाखत नॅशनल न्युज चॅनला आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली यामुळे शासन प्रशासनाने या गुप्त धना बाबत चौकशी करण्यास सुरूवात केली असता संबंधित गुप्त धनामध्ये अफरा- तफर करणाऱ्याने गावगुंडाना हाताशी धरुन खोदकाम करणाऱ्या व प्रसार माध्यमांना माहिती देणाऱ्या लोकांना आमिष दाखवून दमदाटी करुन त्यांचे जबाब बदलून खोटे प्रतिज्ञापत्र बनवून घेण्यात आले. खोदकामाच्या तारीख व शासनास सांगितलेली तारीख यामध्ये खोदकाम करणारे व्यक्‍तीने सांगितले की, वटसावित्री पोणिमिच्या दिवशी म्हणजेच दि. २४/६/२०२१ रोजी खोदकाम झाले परंतु जागा मालक राजेश खटोड सांगतात की, दि. ५/७/२०२१ रोजी सदर धन सापडले आणि सदर माहिती श्रीरामपूर येथील तहसिलदार यांना दि. १३/७/२०२१ रोजी कळवली त्यानंतर दि. १४/७/२०२१ रोजी  प्रशासनाने पंचनामा केला  त्यामध्ये एका छोट्या कळशीत फक्त चांदीचे नाणेच दाखविले प्रशासनाला दिलेल्या तारखांमध्ये व खोदकाम करणाऱ्या मजुरांनी दिलेली मुलाखत व लिहून दिलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये मोठी तफावत दिसत आहे. गावातील काही गाव पुढाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी उकते घेतले ही चर्चा आहे.तरी या गुप्त धनातील संबंधितां सर्व लोकांना ताब्यात घेवून सखोल चौकशी केल्यास हंड्यातून सोन्याची नाणी हडपण्याचे सत्यता समोर येईल, या सर्व विषयाची गांभ्रीयाने चौकशी करून संबंधित लोकांवर शासनाची फसवणूकीचे सर्व कठोर ‘कलम लावून कायदेशिर कारवाई करण्यात यावी.

येत्या ३ ते ४ दिवसांत सबंधितांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण’ सेनेच्या वतीने आपले कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे

याप्रसंगी जिल्हा सचिव तुषार बोबडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष उदय उदावंत, मनविसे तालुका अध्यक्ष राहुल दातीर, मनविसे शहराध्यक्ष विशाल शिरसाठ,गणेश राऊत मनसे शहर उपाध्यक्ष,वाहतूक सेना तालुकाध्यक्ष करण कापसे, आदी मनसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here