माळवाडगाव/प्रतिनिधी(संदिप आसने) :-  श्री क्षेत्र अडबंगनाथ तपोभूमी ही नाथांची भूमी ही प्राचीन काळापासून आहे या भूमीत जो भक्त येतो त्याला भाग्य असावे लागते वर्षभरात अनेक एकादशी असतात मात्र आषाढी एकादशी हिला खूप महत्त्व आहे ही एकादशी मानवी जीवाला मोक्ष देणारी आहे असे उद्गार श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थांनचे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी संस्थान येथे एकादशीनिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात केले.
       कोरोणा संसर्ग काळ असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करून श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि अडबंगनाथ संस्थानचे महंत अरुणनाथगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली येथे एकादशी महोत्सवाची साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आले होते पंढरपुरला गेल्यानंतर सर्वांनाच विठुरायाचे दर्शन होणे अशक्‍य असते मात्र मंदिर,कळस,भिंती व चंद्रभागेच्या स्नानाने मानवाला अनंत कोटीचे पुण्य प्राप्त होते, तसेच आषाढी एकादशीला देखील खूप महत्त्व आहे श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे या दिवशी जो भाविक येतो त्याला देखील अनंत कोटीचे पुण्य प्राप्त होते अडबंगनाथ संस्थांनच्या विकासासाठी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे देखील मोठे योगदान आहे गेल्या वर्षापासून आषाढी पायी दिंडी सोहळा बंद असल्याने मंदिरास प्रदक्षिणा घालून भाविकांनी पदयात्रा साजरी केली अडबंगनाथ संस्थान मध्ये त्यावेळेस दर्शनासाठी आल्यावर समाधान व सुख प्राप्त होते तर अडबंगनाथ संस्थानची पायी दिंडी एक शिस्तबद्ध दिंडी म्हणून नावारूपाला येत आहे कोरुना काळ असल्याने दिंड्या निघाल्या नाही देशावर फार मोठे संकट आहे हे संकट लवकर दूर व्हावे तसे त्यांनी अडबंगनाथ चरणी साकडे घातले सद्गुरु नारायनगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अडबंगनाथ संस्थानचे महंत अरुणनाथगिरी महाराज यांच्या प्रयत्नाने हे तीर्थक्षेत्र आज जगाच्या कानाकोपर्‍यात नावारूपास येत असल्याचे मनोगत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी येथे व्यक्त केले. या दिनी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी भाविकांना साबुदाणा खिचडी व प्रसादाचे वाटप केले व महाराजांचे संत पुजन केले या समारंभास मंदाताई कांबळे,पोलीस पाटील मधुकर बनसोडे,अण्णासाहेब आसने,प्रमोद आसने,रंगनाथ वर्पे,यशवंत हुरुळे,धोंडीराम बनसोडे,अशोक मुठे,काशिनाथ घोरपडे,येडू पवार,पत्रकार विठ्ठलराव आसने,संदीप आसने,दत्तात्रय जानराव,प्रफुल्ल दांगट,लखन महाराज,पंकज खाडे भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here