देवळाली प्रवरा/प्रतिनिधी :- शहरात झालेल्या जबरी चोरी प्रकरणाची उपविभागीय पोलीस अधिकारी  संदिप मिटके यांच्या कडून गंभीर दखल दिनांक १८/०७/२०२१ रोजी मध्यरात्री देवळाली प्रवरा येथे झालेल्या जबरी चोरी व घरफोडीचे प्रकरणाची पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी गंभीर दखल घेत देवळाली प्रवरा दूरक्षेत्र चे अधिकारी व अंमलदार यांच्या तडकाफडकी बदल्या करून त्यांचे जागी नवीन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे

देवळाली प्रवरा सह इतर 32 गावातील कामकाज या विषयावर  देवळाली प्रवरा नगरपरिषद येथे आमदार लहू कानडे  यांनी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीदरम्यान देवळाली प्रवरा येथे झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने आमदार लहू कानडे व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचेत  चांगलीच खडाजंगी झाली होती सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपविभागीय संदीप मिटके यांनी देवळाली प्रवरा चे सर्व अधिकारी व अंमलदार यांची तात्काळ बदली करून त्यांचे जागी नवीन अधिकारी आणि अंमलदार यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, सहाय्यक फोजदार टिक्कल, पोलिस नाईक जानकीराम खेमनार, पोलिस कॉन्स्टेबल गणेश फाटक, पोलिस कॉन्स्टेबल  अमोल पडोळे, पोलिस कॉन्स्टेबल किरण ठोंबरे यांची तात्काळ बदली केली तर त्यांच्या जागी नवनियुक्त अधिकारी कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ पोलिस हेड/कॉ प्रभाकर शिरसाठ पोलिस नाईक  वैभव साळवे, पोलिस कॉन्स्टेबल सुरेश भिसे,  महेंद्र गुंजाळ, सागर माळी, शहामद शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here