राहुरी ( प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीस दलातील पोलिसांची सेवा कार्यकाला नुसार पदोन्नती जाहीर करण्यात आलेली असताना अहमदनगर पोलीस दलातून राहुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या तब्बल १६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे.

राहुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या ३ पोलीस हवालदार,  ८ पोलीस नाईक व ५ पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या सेवा कार्यकालानुसार पदोन्नती मिळाली असून राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेले नारायण यादवराव ढाकणे, चंद्रकांत निवृत्ती बऱ्हाटे, संजय यशवंत शिंदे, या तिघांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे, तर पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले योहान शांतवन सरोदे, आदिनाथ भगवान बडे, वाल्मीक दादाभाऊ पारधी, संजय शंकर कारेगावकर, सोमनाथ भगवान जायभाय, संजय बाबुराव राठोड, दिनकर राजाराम चव्हाण, विठ्ठल न्हनू राठोड  या आठ जणांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळाली आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले उत्तरेश्वर सोमनाथ मोराळे, मंजुश्री सुभाष गुंजाळ,जालिंदर धनाजी साखरे, शाहमद शब्बीर शेख,गणेश भरत सानप या पाच जणांची पोलीस नाईक पदी पदोन्नती मिळाली आहे.

राहुरी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पदोन्नती मिळाल्या बद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके , राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या हस्ते सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात. थेट पोलिस उपविभागीय अधिकारी साहेबांनीच पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर स्टार लाऊन दिल्यामुळे कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.  पोलिस उपनिरीक्षक वाघ यांनी प्रास्तविक केले , सहाय्यक फोजदार ढाकणे, सहाय्यक फोजदार गायकवाड, हेड/कॉ राठोड, हेड/कॉ चव्हाण, महिला पोलिस नाईक गुंजाळ, पोलिस नाईक साखरे यांनी भावना व्यक्त केल्या तर महिला पोलिस नाईक कोहकडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here