खंडाळा/प्रतिनिधी (गौरव डेंगळे) :- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या आधिपत्या – खाली खंडाळा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (पिंपळाचा वाडा) येथे गुरुपौर्णिमा उत्सव शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत उत्सवात संपन्न झाला.श्री स्वामी समर्थ सेवामार्गांतर्गत भारतभर व भारताबाहेर हजारो केंद्रांच्या माध्यमातून गुरू माऊलींनी लाखो सेवेकऱ्यांना सक्रिय केले आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे ‘व्यासपौर्णिमा’ हा उत्सव सेवेकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचा असतो.

शुक्रवार पहाटेपासून गावातील सेवेकऱ्यांनी पिंपळाचा वाडा येथे गर्दी केली होती. सकाळी भूपाळी आरतीनंतर,सामुदायिक श्री स्वामी समर्थ मंत्र जप स्वाहाकार ,नैवेद्य आरती,श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचार पूजा,अभिषेक यावेळी उपस्थित सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले. त्यानंतर साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

प्रत्येकाच्या ऐहिक,भौतिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुचे महत्त्व आपल्या संस्कृतीत आहे आणि ‘गुरुपूजनाचे’ म्हणजेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व ही तेवढेच असल्याने आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जावून या आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद श्रीरामपूर तालुक्यातील सेवेकऱ्यांनी घेतला. आज गुरुपौर्णिेनिमित्त जिल्हाभरातून सेवेकरी या ठिकाणी आपली सेवा स्वामींन चरणी रुजू करण्यासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here