श्रीरामपूर/प्रतिनिधी : शहरात पालिकेच्या धक्कादायक कारभार समोर आला असून, ज्यात पालिकेचे सत्ताधारी व आधिका-यांनी सांगणं मताने, भ्रष्टयाचार केल्याचा आरोप करत. काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलना वेळी लावण्यात आलेला फ्लेक्स बोर्ड हा चर्चेचा विषय बनला होता. कारण त्या फ्लेक्स बोर्डवर , स्मशानभूमी दुरुस्तीच्या नावाखाली, ४ मे २०२१ ला रूपरतन मेटल कास्ट प्रा. लि. ला १ लाख ४७ हजार ६४३ रुपये, १८ मे २०२१ ला ठेकेदार भीमा परदेशी यास ६९ हजार ९१४ रुपये, व पुन्हा २१ मे २०२१ ला, रूपरतन मेटल कास्ट प्रा. लि. ला २८ हजार ९८४ रुपये अदा कारण आल्याची माहिती, १२ जुलै २०२१ च्या पालिकेच्या ऑनलाईन सभेतील, बिलांचा गोषवा-यात समोर आल्याने. नगरपालिकेने स्मशानभूमीच्या कामासाठी ,एकूण २ लाख ४६ हजार ५४६ रुपये मंजूर केलेले आहे, परंतु प्रत्यक्षात पहाणी केली असता. यापैकी कोणतेच काम झाल्याचे नसतांना देखील, रूपरतन मेटल कास्ट प्रा. लि. व भीमा परदेशी यांचे बिले काढल्याचे समोर आल्याने, या दोन्ही ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करत, काँग्रेसच्या वतीने पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले  तसेच यासंदर्भात जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगत, पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले यासंदर्भात कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील आंदोलकांनी यावेळी दिला.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्या आलेल्या आंदोलनास, पक्षप्रतोत संजय फंड, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक मुज्जफर शेख, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, आबा रोटे, अभिजित लिप्टे, निलेश भालेराव, माजी नगरसेवक आशिष धनवटे, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थितीत होते.

विरोधकांचे आंदोलन हे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तसेच शहरातील चाललेल्या विकासा संदर्भात लोकांची दिशाभूल करण्यासाठी असून, विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, कामात तृटी असू शकते मात्र काम झालेच नाही असे होणार नाही, पण आज जे माझ्यावर आरोप करीत आहेत, त्यांनी त्यांच्या काळात जर एवढ्याच पोट तिडकीने इमानदारीत कामे केली असती तर, मला जनतेने या खुर्चीवर बसविलेच नसते, तेव्हा माझ्या वर आरोप करणा-यांनी आत्मपरीक्षण करावे :- लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here