जुन्नर शहरातील एका तरुणाशी लग्न करण्याचा बनाव करुन फसवणूक केल्याप्रकरणी बेलापुर येथील रखमा गाढे सह चार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची जुन्नर पोलीसांनी दिली आहे.

               जुन्नर शहरालगतच्या कबाडवाडी पाडळी येथील शेतकरी तरुणाशी लग्न करण्याचा बनाव करून लग्नानंतर रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने घेऊन नवरी पळून गेल्याप्रकरणी दाखल प्रकरणाचा तपास जुन्नर पोलिसांनी शिताफीने तपास करून यामधील चार आरोपींना अटक केली आहे.गणेश रामदास पवार या शेतकरी तरुणाने याबाबतची फिर्याद दि. २८ एप्रिलला जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गणपत आबाजी चौधरी (रा. चांदवड, नाशिक), छाया बाबूराव गायकवाड, रुपाली बाळासाहेब शिनगारे, सुनीता बाळासाहेब शिनगारे (सर्व जण रा. खंडाळा, श्रीरामपूर), रखमाजी गाडे-पाटील (रा.बेलापूर, श्रीरामपूर) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व आरोपींचा जुन्नर पोलिस शोध घेत होते. सायबरमार्फत या सर्वांचे मोबाईल लोकेशन काढून माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल लोहकरे, पोलिस अंमलदार संदीप लोहकरे, प्रशांत म्हस्के, वाल्मीक शिंगोटे, प्रसाद दातीर, मनीषा ताम्हाणे, किरण आघाव, शीतल गारगोटे या पथकाने चांदवड व श्रीरामपूर येथे जाऊन या पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here