श्रीरामपूर/प्रतिनिधी :-  जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा
प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे असे असतांना ग्रामपंचायतीने देखील बाजार बंद ठेवण्याबाबत यापूर्वी सूचना दिली होती.मात्र माळवाडगांवात लॉकडाऊनचे नियम ढाब्यावर ठेवून थेट नियमांचे उल्लंघन करत प्रत्येक शनिवारी आठवडे बाजार भरत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करण्याऐवजी बाजाराकडे दुर्लक्ष केले जात आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांचे जीवितांचे रक्षणासाठी राज्यशासन कठोर उपाययोजना आखून कुठल्याही स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात शनिवार व रविवारी लॉक डाउन घोषित करण्यात आले आहे. नागरिकांना घरातच राहण्याची सक्ती करतांनाच गर्दी जमवण्यापासून रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली. तसेच राज्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात सीआरपीसीचे कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. सोबतच साथरोग नियंत्रण कायद्याच्या भादंवी १८८ नुसार पोलीस प्रशासन गुन्हे नोंदवत आहे.

त्यानुसारच आज पोलिसांनी माळवाडगांव येथे आठवडे बाजारात अचानक दाखल होत बाजारातील शेतकरी व विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र, माळवाडगांव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजयकुमार मेहेत्रे यांच्या दुर्लक्षामुळे दर शनिवारी आठवडे बाजार भरत असून सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहे. विशेष म्हणजे या पूर्वीच्या ग्रामसेविका प्रियंका शिंदे या दर शनिवारी माळवाडगाव येथे सकाळी सहा वाजताच येऊन थांबत असत त्यामुळे त्यांच्या कालावधीत त्यांनी माळवाडगांव येथे एकही शनिवारी त्यांनी बाजार भरू दिला नाही. मात्र या ठिकाणी असलेले ग्रामसेवक विजयकुमार मेहेत्रे यांनी माळवाडगाव ग्रामपंचायतीचा चार्ज घेतल्यापासून एकही दिवस बाजाराच्या दिवशी गावात हजर नाही त्यामुळे माळवाडगांव येथे दर शनिवारी बाजार भरत आहे बाजार करूना उदरनिर्वाहासाठी भाजीपाला घेऊन विक्री करावी लागत आहे मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासनाने भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकरी व विक्रेते यांच्यावरच दंडात्मक कारवाई केली मात्र या गोरगरिबांवर कारवाई करण्याऐवजी माळवाडगांव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजयकुमार मेहेत्रे यांनाच बाजार भरविण्यास जबाबदार धरून ग्रामसेवक मेहेत्रे यांच्यावरच कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिकांमधून केली जात आहे.

…बाजार भरल्याचा पोलिसांना फोन करणारा कोण…?माळवाडगावात शनिवारी आठवडे बाजार भरत असून आज शनिवारी बाजार भरल्यानंतर पोलिसांना फोन करणारा कोण अशी चर्चा गावात दिवसभर सुरू होती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here