श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरातील बेलापूर रेल्वे स्थानकापासून, काही अंतरावर असलेल्या रेल्वे हद्दीतील भितीलगत अर्चना हॉटेल समोरील भागात शहरातील फकिरवाडा परिसरातील मुजाहिद मस्तान शेख या २३ वर्षीय युवकांचा मृतदेह आढळुन आल्याने हा अपघात आहे की घातपात या संदर्भात शहरात चर्चेला उधाण आले होते

यासंदर्भात मयताच्या घरच्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्या नंतर, तात्काळ शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवीली, आणि अरबाज शाह व इरफान सय्यद या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. सदरचा प्रकार उजेडात आला. ज्यात रात्री २ ते २ : ३० वाजेच्या सुमारास, मयत मुजाहिद शेख , इरफान सय्यद व अरबाज शाह हे चोरी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या रेल्वेच्या डब्यात घुसले त्या ठिकणी त्यांनी २ प्रवासाचे मोबाईल देखील चोरले मात्र  रेल्वे डब्यातील लोकांच्या लक्षात हे आल्याने ते मयत मुजाहिद व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी येत असतांना  भीती पोटी मयत मुजाहिद शेख याने रेल्वेच्या डब्यातून उडी मारली  परंतु त्याचवेळेस विरुद्ध दिशेने एक माल वाहतुक रेल्वे जात असल्याने मुजाहिद यास माल वाहतूक रेल्वेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला, त्यावेळी जखमी मुजाहिद यास इरफान व अरबाज यांनी रेल्वे रुळापासून ८० फुटावर असलेल्या. रेल्वे हद्दीतील भितीलगत अर्चना हॉटेल समोरील भागात टाकून इरफान व अरबाज यांनी तेथून पळ काढल्याचे समोर आल्याने मुजाहिद शेख याचा घातपात नसून अपघाती मृत्यू झाल्याने यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो बेलापूर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here