श्रीरामपुर/प्रतिनिधी :- बेलापूर या गावाला खूप जुना इतिहास आहे. या गावात अनेक जुने वाडे आहेत. अशाच एका ठिकाणी राहणारे राजेश खटोड यांच्या जुन्या वाड्याच्या पाठीमागे गार्डन मध्ये झाडे लावण्याचे कामासाठी खोदकाम चालु असतांना एक तांब्याचा हंडा सापडला त्यामध्ये वर चांदीचे नाणे व खाली सोन्याचे नाणे होते व सदर हंडा चार लोकांना ही उचलत नव्हता असे खोदकाम करणाऱ्या मजुरांनी ऐका स्थानिक टी.व्ही. चॅनलला मुलाखत देतांना सांगितले. ही मुलाखत नॅशनल न्युज चॅनला आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली यामुळे शासन प्रशासनाने या गुप्त धना बाबत चौकशी करण्यास सुरूवात केली असता संबंधित गुप्त धनामध्ये अफरा- तफर करणाऱ्याने गावगुंडाना हाताशी धरुन खोदकाम करणाऱ्या व प्रसार माध्यमांना माहिती देणाऱ्या लोकांना आमिष दाखवून दमदाटी करुन त्यांचे जबाब बदलून खोटे प्रतिज्ञापत्र बनवून घेण्यात आले.असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय अधिकारी अनिल पवार तसेच तहसीलदार प्रशांत पाटील यांना समक्ष भेटून बेलापूर येथील गुप्तधनाची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक करणाऱ्या लोकांवर कायदेशिर कारवाई करावी अन्यथा आम्ही उपोषण करू असे निवेदन दिले होते परंतु या गोष्टीला बरेच दिवस उलटल्यानंतर सुद्धा कोणतीही चौकशी झाली नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेलापूर येथील ग्रामपंचायत समोर उद्या उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here