श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील बेलापूर येथे सापडलेल्या गुप्तधन प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज बेलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मनसेच्याच वतीने उपोषण सुरू करण्यात आले

याबाबतची अधिक माहिती अशी की बेलापूर सापडलेल्या गुप्त धनाची काहींनी गुप्तपणे विल्हेवाट लावण्याचा आरोप मनसेने केला असून गुप्तधनाच्या गुप्तपणे विल्हेवाट लावणाऱ्या लोकांची सीआयडी मार्फत चौकशी करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच गुप्त सापडलेले ठिकाण शासन ताब्यात घ्यावे तसेच गुप्तधन शासनाने ताब्यात घेऊन त्याचा वापर बेलापूर गावातील विकास कामासाठी करावा असे म्हटले आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपोषण करण्यात आले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हे उपोषण सुरू करण्यात आले.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे जिल्हा सचिव तुषार बोर्डे ,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय  नवथर , तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे , विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल दातीर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, कामगार सेना तालुका अध्यक्ष भास्कर सरोदे , तालुका उपाध्यक्ष प्रविण कारले, तालुका चिटणीस विष्णू अमोलिक,  अतुल तारडे,निलेश सोनवणे, वैभव पवार, मारुती शिंदे ,गणेश राऊत, रतन पवार, मनोज शिंदे, संदीप पवार ,सुरेश शिंदे, रवी थोरात, रवी शिंदे, श्याम जगताप, पप्पू पठारे, सागर अमोलिक, सुरज अमोलिक, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गुप्तधनाच्या चौकशी  करण्याच्या मागणीचे निवेदन देऊन शासनस्तरावर ग्रामपंचायतीचे यासाठी पाठपुरावा करावा असा आग्रह सरपंचाकडे लेखी निवेदनाद्वारे करत असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे  यांनी सांगितले.

गुप्तधन सापडले का तारक यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे शिवाय खोदकाम करणार्‍या नाही दिलेल्या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत चांदी बरोबर सोन्याचे नाणे सापडले ते म्हटले आहे प्रत्यक्षात मात्र चांदीचे नाणे पंचनामा यावेळी सादर करण्यात आले असे बाबासाहेब शिंदे यांनी सर्व प्रकार संशयास्पद असून खोदकाम करण्याची तसेच भक्तांची परस्पर विल्हेवाट लावणार याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर द्यावे अशी मागणी आमचे असून त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here