श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील टिळकनगर इंडस्ट्रीजचे जनरल सेक्रेटरी अशोक अर्जुन बोरगे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाची परिस्थिती व वाढत्या महागाई चा विचार करून टिळकनगर इंडस्ट्रीजचे चेअरमन अमित डहाणूकर व शिवानी डहाणूकर यांनी सन २०२१ ते २०२३ या वर्षाकरिता कामगारांना  ६८०० अशी पगार वाढ करून कामगारांना दिलासा दिला आहे.

सर्व कामगारांना समान पद्धतीने मूळ पगार व (बेसिक/डीए) अशा पद्धतीने कामगारांना पगारवाढ देण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अशोक बोरगे व अध्यक्ष बाळासाहेब कटारनवरे यांनी दिली आहे. टिळकनगर इंडस्ट्रीज अँड जनरल मॅनेजर व डायरेक्टर सी.आर.रमेश, डेप्युटी जनरल मॅनेजर डी.एस.मोरे, लिगलचे ॲड.अमित पवार, लेबर ऑफिसर अमोल काळे, अकौटंट अकौंटंट मॅनेजर नकुल शिंदे यांनी कंपनीची आर्थिक परिस्थिती तसेच कंपनीचा नफा-तोटा व आर्थिक बजेट कामगार  संघटनेसमोर मांडले.

जानेवारी २०२१ मध्ये २७२०,२०२२ मध्ये २०४०,२०२३ मध्ये २०४० असे तीन वर्षासाठी पगारवाढ असणार आहे. कामगारांच्या मुलांची शैक्षणिक फी सुद्धा डहाणूकर उद्योग समूह भरणार असून कामगारांचे घरातील मुले, पत्नीचा विमा पॉलिस उतरवलेली आहे. करोना काळात उत्पादन बंद असतानाही सममुहाने कायम कामगारांना त्यांचा पूर्ण पगार दिला आहे. त्यामुळे कामगारांना ही कारखाना व डहाणूकर कुटुंबीयांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे ठरवले असल्याचे कटारनवरे व अशोक बोरगे यांनी सांगितले.

हा निर्णय  घेतल्याबद्दल कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अशोक बोरगे, अध्यक्ष बाळासाहेब कटारनवरे, सह सेक्रेटरी बाळासाहेब घोडेकर, खजिनदार बाळासाहेब विखे, सह खजिनदार प्रमोद माघाडे, उपाध्यक्ष शांत्वन गायकवाड, पदाधिकारी अनिल जेधे, रोहिदास सरोदे ,गणेश सोनवणे, बाळासाहेब शिनगारे, विजय भोसले विलास आरणे, युनूस शेख, विष्णू कमानदार नंदकुमार फटांगरे यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here