माळवाडगांव (प्रतिनिधी संदिप आसने)  लग्नसमारंभात कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालयांना पोलीस पथकाने चांगलाच दणका दिला आहे. सामाजिक अंतर न पाळने, ५० व्यक्तींची मर्यादा ओलांडणे, सॅनिटायझर नसणे अशा नियमांचे उल्लंघन केल्याने टाकळीभान शिवारातील रुख्मिणी माधव मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने श्रीरामपूर तालुका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईला सुरवात केली आहे. यासाठी पोलीस पथके तयार केली असून, आज पोलीस पथकाने टाकळीभान येथील मंगल कार्यालयांवर धाड टाकली, यावेळी मंगल कार्यालय चालकांची व आयोजकांची चांगलीच धावपळ उडाली.

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या रुख्मिणी माधव मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे,पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके,पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आयुब शेख,मेजर पठाण गोपनियचे अनिल शेंगाळे यांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कार्यक्रम आयोजन करण्याऱ्या संस्थांनी, मंगल कार्यालयांनी कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले पाहिजे, योग्य ते सामाजिक अंतर ठेवावे, व्यक्तींची मर्यादा ओलांडू नये, सॅनिटायझर मशिनची व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here