श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातील सूतगिरणी परिसरात असलेल्या दुर्गानगर भागात प्रेम प्रकरणातून रात्री ०९:४५ वाजेच्या सुमारास शुभम राजु जवळकर नावाच्या युवकावर शुभम यादव नावाच्या युवकाने गोळीबार केल्याची घटना घडली होती सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत दोन्ही आरोपीना १२ तासात गजाआड केले

याबाबत माहिती अशी की, दिनांक २६/०७/२०२९ रोजी रात्री ९०/४५ वा.चे सुमारास दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर येथे शुभम राजु जवळकर वय-२३ वर्ष रा.दुर्गानगर, सुतगिरणी, श्रीरामपूर यास आरोपी नामे शुभम यादव रा.स्मशानभुमीजवळ श्रीरामपूर याने त्याचे साथीदारासह लाल काळ्या रंगाचे पल्सरवर येवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळी मारली होती. सदर गोळीबारात शुभम राजु जवळकर यास छातीवर गोलाकार जखम झाली होती त्यामुळे पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर येथे गु. र. नं. ५०५/२०२१ भादवि कलम ३०७, भा. ह. का. क. ३/२५ प्रमाणे गुन्हा झालेला होता. शुभम राजु जवळकर याचे एक मुली बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सदर मुली सोबत आरोपी शुभम यादव याचे प्रेम प्रकरण चालू होते.त्यामुळे सदर मुलीवरुन दोघामध्ये यापुर्वी वाद झालेले होते. सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप व स्टाफ त्वरीत घटनास्थळी जावून गोपनिय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी १) शुभम राजकुमार यादव वय-१८ वर्ष रा.स्मशानभुमीजवळ वार्ड नं.६ श्रीरामपूर २) मुयर दिपक तावर वय-१८ वर्षे रा.अल्फा हॉस्पिटलमागे वार्ड नं.३ श्रीरामपूर यांना अटक करण्यात आलेली असून सदर गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे हे करित आहेत.

सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक  मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक  श्रीमती दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके साहेब , यांचे सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, पोना/बिरप्पा करमल, पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/पंकज गोसावी, पोकॉ/रघुनाथ कारखेले, यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here