राहुरी/प्रतिनिधी :- पारनेर येथील पत्रकार विजय भास्कर वाघमारे, वय ५२ यांना आरोपीने मोबाईल नं.९७६६०२७४०७ नंबरवरून फोन करून तू आमच्याविरुद्ध बातम्या छापतो काय असे म्हणत वाईट वाईट शब्दात शिवीगाळ करून पारनेर येथील आंबेडकर चौकात रिव्हॉल्व्हर व तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.सदर घटना ही सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून राहुरी येथे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाकडून जाहीर निषेध करण्यासाठी तहसीलदार एफ.आर.शेख व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले आहे.

पत्रकार विजय वाघमारे हे पारनेर येथे आंबेडकर चौकात असताना आरोपी प्रकाश पवार याने विजय वाघमारे यांना तु कुणाच्या आमदार निलेश लंके व राहुल झावरेच्या जीवावर उड्या मारतो‌ असे म्हणून  धारदार हत्यार व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. २६ जुलै रोजी ९.११ च्या दरम्यान ही घटना घडली. पत्रकार विजय भास्कर वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रकाश पवार याच्याविरुद्ध पारनेर पोलिसात भादवि कलम ५०४, ५०६, (२) ५०७ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुरनं. ५३७ दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पो नि नितीशकुमार गोकावे यांनी भेट दिली. पोसई बालाजी पद्मने हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान पारनेर पोलिसांनी तातडीने आरोपीवर गुन्हा दाखल केला असे असले तरी आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी राहुरी येथे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा मार्गदर्शक विलास कुलकर्णी, राहुरी तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे, शहराध्यक्ष शरद पाचारने, जिल्हा सचिव अनिल कोळसे,जिल्हा कोषाध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, तालुका सचिव आकाश येवले, समनव्यक ऋषि राऊत आदिंसह सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here