श्रीरामपूर/प्रतिनिधी :-  महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या वतीने सेवा जेष्ठतेनुसार दिल्या जाणारी अहमदनगर पोलीस कर्मचा-यांची पदोन्नती नुकतीच जाहीर करण्यात आली.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील ९ , शहर पोलीस ठाण्यातील १८, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील ३ अशा एकूण, ३० कर्मचा-यांचा समावेश असून. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, आदींच्या उपस्थितीत पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचा-यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील बेबी शिंदे, संजय गाडेकर, सचिन धनाड तर शहर पोलीस ठाण्यातील दिलीप बुगे, शरिफ शेख, भारत जाधव, एकनाथ सोनावणे, सुनिल वाकचौरे, रविंद्र कोरडे, संतोष परदेशी, संतोष दरेकर, परेश आगलावे,महेश गोडसे, रघुनाथ कारखिले, किरण पवार, दादासाहेब गुंड, भैरवनाथ आडागळे, शितल कांबळे, पंकज गोसावी तालुका पोलीस ठाण्यातील सतिश गोरे, फैय्याज पठाण, नवनाथ बर्डे,अशोक आडागळे, छाया गायकवाड,अनिल शेंगाळे, रुपाली गोल्हार, काकासाहेब मोर,सोमनाथ मुंडले आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here