माळवाडगाव/प्रतिनिधी(संदिप आसने) :-  श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील चार तरुणांवर विनयभंग व ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने येथील विविध सामाजिक संघटना व ग्रामस्थांनी कोरोणा नियमांचे पालन करत एकत्रित येऊन या निंदनीय घटनेचा निषेध करत पोलिस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून शहानिशा करण्याची एकमुखी मागणी केली.

माळवाडगाव शिवारात माळेवाडी रस्त्यावर शेती महामंडळ हद्दीलगत एका बागायतदारांच्या आश्रयाने वास्तव्यास आलेल्या एका आदिवासी महिलेचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये शेतमालाच्या नुकसानी वरून किरकोळ वाद झाला शेतमाल तोडणाऱ्या या आदिवासी कुटुंबास मालधण्याने जाब विचारल्याने भांडण झाले त्या रात्रीच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेलेल्या दोन्ही तक्रारदारांना पोलिसांनी समज देत घरी पाठवले यावर समाधान न झाल्याने आदिवासी महिलेने दुसऱ्या दिवशी दोघांवर गलिच्छ आरोप करत अल्पवयीन मुलीच्या नावाने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली ही वार्ता समजल्यावर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तंटामुक्ती समिती पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रकरण मिटविण्यासाठी बैठक घेतली.

यावेळी श्रीरामपूर वडाळा महादेव येथील सामाजिक महिला कार्यकर्त्या उपस्थित होते. महिलांसह गावातील जेष्ठ नागरिकांनी जागेवरच वाद मिटवण्याचे केलेले प्रयत्‍न असफल झाले याउलट बैठकीत वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तंटामुक्ती समिती सदस्य व ग्रामपंचायत महिला सदस्य पतीचे नाव या आदिवासी महिलेने खोट्या गुन्ह्यात गोवले हा सर्व प्रकार गावासमोर घडल्याने खोट्या गुन्ह्याविरुद्ध संतापाची लाट उसळून काल रविवारी कोविड नियमांचे पालन करत निषेध सभा घेण्यात आली. या घडलेल्या प्रकारावर विचारमंथन होऊन अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमोद आसने,उत्तमराव आसने,बाजीराव आसने,नानासाहेब आसने,सुरेश आसने,जालिंदर आसने,रावसाहेब काळेविश्वास वाघमारे,प्रवीण साळवे,बाळासाहेब आसने,अशोक गुढेकर,पाराजी दळे,विठ्ठल निंबाळकर,उमाजी चव्हाण,दत्तात्रय दळे,दिगंबर आढाव,संजय खुडसने,अजित शेख,इमरान शेख,सुनील शिंदे,मंगेश साळवी,प्रशांत दळे आदी यावेळी उपस्थित होते.

“खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ माळवाडगाव बंद”
गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रकरण मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणांना विनयभंग ॲट्रॉसिटी अशा गंभीर खोट्या गुन्ह्यात गोवले या घटनेचा तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सखोल तपास करावा या मागणीसाठी आज माळवाडगाव बंदचा सर्वपक्षीय सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here