श्रीरामपूर/प्रतिनिधी :- येथील प्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी पोपट भगिरथ महाले ज्वेलर्स (सराफ) यांनी नवीन शाखेच्या शुभारंभप्रसंगी सुरू केलेल्या पहिल्या लकी ड्रॉ ची (मोपेड) सोडत काल दिनांक ०२/०८/२०२१ रोजी सायंकाळी ४.०० वाजता  आयोजित करण्यात आली होती 

याबाबत सचिन महाले यांनी सांगितले की आज राम मंदिर चौक, नगरकर ज्वेलर्सच्या शेजारी, असलेल्या महाले ज्वेलर्सच्या या नवीन शाखेपाशी पहिला लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. त्यात एक ग्रॅम सोने खरेदीवर चार मोपेड, आकर्षक पैठणी अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या मोपेडसाठी लकी ड्रॉ आज दुकानाचे ग्राहक विजय अच्युत बोरुडे यांच्या हस्ते काढण्यात आला.  त्यामध्ये ओम बाळू गाडे या ग्राहकांचा भाग्यवान विजेता म्हणून लकी ड्रॉ लागला असुन या ग्राहकाला मे. पोपट भगिरथ महाले ज्वेलर्सचे संचालक सचिन महाले व ओम महाले यांच्या हस्ते मोपेड टू व्हीलर गाडी  देण्यात आली या लकी ड्रॉ ला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे महाले यांनी सांगितले.

याप्रसंगी मे. पोपट भगिरथ महाले ज्वेलर्सचे संचालक सचिन महाले व ओम महाले तसेच गौरव काळे, संतोष बनसोड, गणेश बागडे, संजय कपिले, वसिम सय्यद, संदेश नागरे, निलेश काजले, किशोर भागवत आदी दालनातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here